यामी अडकली विवाह बंधनात, ‘उरी’च्या दिग्दर्शकासोबत घेतले ‘सातफेरे’!
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री यामी गौतम हिने गुपचूप लग्न गाठ बांधली आहे. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री यामी गौतम हिने अनेक चाहत्यांना धक्का दिला आहे .तीने गुपचूप लग्न गाठ बांधली आहे. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. यामी गौतमने आदित्य धरसोबत लग्न केले आहे. आदित्य धर यामी गौतम अभिनित ‘उरी’ या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. SURPRISE ! Actress Yami Gautam ties knot with director Aditya Dhar in secret ceremony
https://www.instagram.com/p/CPsp4oGFnE5/?utm_source=ig_web_button_share_sheet
कोरोना काळात बर्याच छोट्या-मोठ्या कलाकारांनी लग्न उरकली होती. ज्यात आता यामी गौतमच्या नावाचाही समावेश झाला आहे. यापूर्वी बॉलिवूड अभिनेता वरुण धवन याने देखील जानेवारी महिन्यात आपली बाल मैत्रीण नताशा दलाल हिच्याशी लग्न केले होते. त्यानंतर आता यामी गौतमने देखील लग्न केले आहे. यामी या वधू वेशामध्ये खूपच सुंदर दिसत आहे. अभिनेत्रीचे चाहते देखील तिच्या या सोशल मीडिया पोस्टवर सतत अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.
अभिनेत्रीने आपल्या पोस्टची सुरूवात पर्शियन कवी रुमी यांनी लिहिलेल्या कविताने केली होती, तिने लिहिले आहे, “तुझ्या प्रकाशात मी प्रेम करायला शिकले.” अभिनेत्रीने पुढे लिहिले आहे की, ‘आमच्या संपूर्ण कुटुंबाच्या आशीर्वादाने, आज आम्ही लग्न केले आहे, हा एक अगदी घरगुती सोहळा होता. खूप कमी लोक उपस्थित असल्याने आम्ही हा आनंदी सोहळा आमच्या कुटुंबासमवेत साजरा केला.’
यामी गौतम आणि आदित्य धर हे एकमेकांना ‘उरी’ या सिनेमापासून ओळखतात. आदित्य एक उत्तम दिग्दर्शकांपैकी एक आहेत. यामी गौतम आणि आदित्यच्या लग्नाच्या फोटोवर शुभेच्छांचा वर्षावर होत आहे. सोशल मीडियावर हा फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. अभिनेता वरुण धवनने सर्वात आधी हा फोटो लाईक केला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App