SURGICAL STRIKE PROOF : NEW INDIA WILL NOT TOLERATE THIS ! हिमंता बिस्वा सरमा यांनी शेअर केला sergical strike चा पुरावा ! के. चंद्रशेखर राव यांना फटकारले


सर्जिकल स्ट्राईक केला की नाही, असा प्रश्न लष्कराला विचारणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे.


न्यू इंडिया आमच्या लष्कराचा अपमान सहन करणार नाही…सरमा यांनी व्हिडिओसह ट्विट केले आहे.


विशेष प्रतिनिधी

गुवाहाटी : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना उद्देशून भारतीय सैन्याने वर्ष २०१९ मध्ये पाकिस्तानमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईक’चे व्हिडिओ ‘कू’ या सोशल मीडियावर प्रसारित केले आहेत.SURGICAL STRIKE PROOF : NEW INDIA WILL NOT TOLERATE ! Himanta Biswa Sarma shares video graphic evidence of surgical strike, slams KCR

काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सैन्याने पाकमध्ये केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’चे सरकारकडे पुरावे मागितले होते. तेव्हा तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी गांधी यांचे समर्थन करत त्यांनी केलेली मागणी योग्य असल्याचे म्हटले होते.

 

हेमंत बिस्व सरमा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे, ‘सर्जिकल स्ट्राईक झाल्याचा हा घ्या पुरावा ! असे असूनही तुम्ही भारतीय सैन्यदलांच्या शौर्यावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत आहात. तुम्ही सैन्याला अपमानित करण्यासाठी एवढे हतबल का झाले आहात ? ‘नवा भारत’ तुम्ही सैन्याचा केलेला अवमान सहन करणार नाही !’

२. राव यांनी याआधी म्हटले होते, ‘भारत सरकारला पुरावा दाखवू दे. त्याचे हे दायित्व आहे. लोकांमध्ये याविषयी संभ्रम आहे. भाजप खोटा प्रचार करत असल्यामुळे जनता पुरावे मागत आहे. लोकशाहीमध्ये तुम्ही राजा अथवा सम्राट असू शकत नाही !’

सरमा यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये नकाशे, उपग्रह प्रतिमा आणि विविध व्हिडिओंचे कट शॉट्स यांचा समावेश आहे.

भारतीय लष्कराने सप्टेंबर २०१९ मध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) सर्जिकल स्ट्राईक केले होते.

SURGICAL STRIKE PROOF : NEW INDIA WILL NOT TOLERATE ! Himanta Biswa Sarma shares video graphic evidence of surgical strike, slams KCR

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था