दिल्ली न्यायालयाने शशी थरूर यांना सर्व आरोपातून मुक्त केले.Sunanda Pushkar death case: Delhi court clears Shashi Tharoor of all charges
काँग्रेस खासदार शशी थरुर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात दिल्ली कोर्टाने थरुर यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत.
वृत्तसंस्था
नवी दिल्ली: काँग्रेसचे नेते आणि खासदार शशी थरूर यांना सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात शशी थरूर यांच्यावर आरोप करण्यात आलेले होते. या सर्व आरोपातून दिल्ली न्यायालयाने थरूर यांची मुक्तता केली आहे. या निकालानंतर थरूर यांनी न्यायालयाचे आभार मानले. १७ जानेवारी २०१४ मध्ये दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये सुनंदा पुष्कर यांचा मृतदेह आढळून आला होता.Sunanda Pushkar death case: Delhi court clears Shashi Tharoor of all charges
Delhi Court discharges Congress leader Shashi Tharoor in connection with Sunanda Pushkar death case. pic.twitter.com/LKdfquticy — ANI (@ANI) August 18, 2021
Delhi Court discharges Congress leader Shashi Tharoor in connection with Sunanda Pushkar death case. pic.twitter.com/LKdfquticy
— ANI (@ANI) August 18, 2021
२०१४ मध्ये घडलेल्या सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी दिल्लीतील राऊज एव्हेन्यू न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला. सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यू प्रकरणी खासदार शशी थरूर यांच्यावर आरोप करण्यात आले होते. न्यायालयाने शशी थरूर यांची या आरोपांतून निदोर्ष मुक्तता केली.
१७ जानेवारी २०१४ रोजी दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सुनंदा पुष्कर यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी शशी थरूर यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) आणि कलम ४९८ अ (पती वा त्याच्या कुटुंबियांकडून छळ) अतंर्गत गुन्हा दाखल केला होता.
१७ जानेवारी… दिल्लीत काय घडलं होतं?
सुनंदा पुष्कर यांनी मृत्यूच्या काही दिवस अगोदर गंभीर आरोप केला होता. त्यांच पती म्हणजे शशी थरूर यांचे एका पाकिस्तानी पत्रकाराशी संबंध असल्याचा दावा त्यांनी केला होता. १५ जानेवारी २०१४ रोजी शशी थरूर यांच्या ट्विटर अकाऊंटवर पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार हिने पाठवलेले कथित खासगी मेसेज शेअर करण्यात आले होते.
मात्र, तरार यांनी खाते हॅक झाल्याचं सांगितलं होतं. मात्र सुनंदा पुष्कर यांनी दावा केला, की तरारचे खाते हॅक झालेले नसून, तिने आपल्या पतीवर पाळत ठेवली असावी, हे उघड करण्यासाठीच आपण ते मेसेज ट्विटरवर पोस्ट केले. त्यांनी मेहरवर आयएसआयची एजंट असल्याचाही आरोप केला होता.
या प्रकरणानंतर सुनंदा पुष्कर यांनी ‘आपल्याला निवडणुकीच्या वर्ष असल्यानं या प्रकरणाबद्दल सार्वजनिकपणे भाष्य करायचं नाही’, असं म्हटलं होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी, शशी थरूर यांच्या फेसबुक पेजवर ‘सुनंदा आणि शशी थरूर यांचे संयुक्त निवेदन प्रसिद्ध केलं होतं.
‘आम्ही आनंदाने विवाहबद्ध आहोत. सुनंदा पुष्कर आजारी पडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि त्या विश्रांती घेत होत्या. सुनंदा यांच्यावर ल्यूपस एरिथेमॅटोससचा उपचार केला जात होता, हा एक प्राणघातक विकार आहे’, असं या निवेदनात म्हटलेलं होतं.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App