लाईफ स्किल्स : तुमच्या प्रयत्नात सातत्य असेल तरच मिळते यश


निरंतरता ही यशाची गुरूकिल्ली आहे. सफलतेचं रहस्य आहे. याचं उदाहरण बघायचं तर मुंगीकडे बघा. मुंगी ही सदोदीत कामात गुंतलेली दिसते. सतत तीची लगबग सुरू असतेच. आपल्या वजनापेक्षाही जास्त भार सांभाळत ती आपल्या भविष्यासाठी अन्नाची साठवण करत असते.Success is possible only if there is consistency in your efforts

उन्हाऴ्यात किंवा पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर आसपास असलेल्या मातीचे निरीक्षण केले तर दिसते तो तीने बांधलेला वातानुकुलीत बंगला. हजारो खिडक्यांचा. मला कितीशी जागा लागणार आहे राहायला असा विचार जर मुंगीने विचार केला असता तर इतका मोठा इमला तिला शक्य होता का ? नाहीच.

पण न थकता सातत्याने हातात घेतलेलं काम करायचं हा तिच्या अंगी असलेला गुण आपणही घ्यायलाच हवा. ज्या लोकांना या निरंतरतेचं रहस्य कळलं त्या लोकांनी सातत्य टिकवलं. सचिनसारख्या महान खेळाडूने क्रिकेट खेळण्याचं सातत्य टिकवलं. अमिताभ बच्चन यांनी तर सातत्याने काम करून नव्या पिढीला अभिनयाला वय नसतं असा धडा घालून दिला.

गानसरस्वती लता मंगेशकर यांनीही गाणे गात राहून इतिहास बनवला. तुम्ही यांच्या यशाच्या मागे काय आहे हे पहाल लक्षात येईल ती आहे सातत्यता, निरंतरता. महान कामे त्यांच्याच हातातून घडतात ज्यांनी एखाद्या गोष्टीचा ध्यास घेऊन त्यासाठीच्या प्रयत्नात सातत्य टिकवले.

जगप्रसिद्ध धावपटू उसैन बोल्टची त्याच्या कोणत्याही छायाचित्रातली पोझ बघितली तरी तो मी गतिमान आहे, मी आजही इथे आहे उद्याही असे सांगते. इतका आत्मविश्वास त्याच्याकडे आहे. याचं कारण एकच प्रयत्नात निरंतरता. रोजचा सराव, प्रयत्नांची पराकाष्ठा या गुणांच्या आधारे कोणतीही व्यक्ती यशाला केवळ गवसणीच घालते अशातला भाग नाही तर मिळालेल यश कायमस्वरुपी चिरकाल टिकवूही शकते.

Success is possible only if there is consistency in your efforts

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात