विशेष प्रतिनिधी
नांदेड : शिवसेनेतील नाराज नेते सुभाष साबणे यांना देगलूर बिलोली जागेसाठी भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. सुभाष साबणे शिवसेनेत नाराज होते. त्यांनी आज भाजप प्रवेशाची घोषणा केली आहे. मात्र ही घोषणा करताना, “शिवसेनेत माझं कुणाशी वाकडं नव्हतं. अशोक चव्हाण यांच्या जिल्ह्यातल्या एकाधिकारशाहीला कंटाळून आपण शिवसेना सोडतोय”, असा आरोप त्यांनी केला. सुभाष साबणे यांना शिवसेना सोडताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणीनं हुंदका दाटून आला. शिवसेनेतील आठवणी सांगताना सुभाष साबणे यांना अश्रू अनावर झाले.Subhash Sabne: Shiv Sainik leaving Shiv Sena – fed up with Congress dictatorship -joins BJP! Deepened by the memory of Balasaheb …!
काय म्हणाले साबणे ?
शिवसेना संपवण्याचा प्रयत्न नांदेड जिल्ह्यामध्ये अशोक चव्हाण करत आहेत. उद्धव ठाकरे हे सज्जन आहेत त्यांना डावपेच माहीत नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यात मास्टर झालेली लोक आहेत. पायातपाय घालण्यात आणि राजकारणात हे पीएचडी झालेली माणस आहेत. शिवसेनेचे यामुळे मोठं नुकसान आहे, असे गंभीर आरोप करत त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला.
“माझ्या सारखी परिस्थिती अनेकांची आहे. माझ्या सारख्या अनेक लोकांची इच्छा आहे की शिवसेनेने आता या महाविकास आघाडीतून बाहेर यावं. आमदार आणि खासदारांची हीच इच्छा आहे. मी जर सहन करून बसलो असतो तर आता काँग्रेस ला मतदान मागितलं असतं आणि मग 2024 ला कुणासाठी मतदान मागितलं असतं”, असा सवाल सुभाष साबणे यांनी केला आहे. “आज पंज्याला मतदान द्या असं म्हणायचं आणि मग 2024 ला कुणाल मतदान द्या म्हणून सांगायचं?
आयुष्यात जय पराजय होत राहतो पण माझ्या कार्यकर्त्याला बुटाने मारण्याचा जो प्रकार झाला त्या मनाला वेदना देऊन गेल्या. राज्यात काँग्रेस संपली होती. उद्धव साहेबांमुळे तुम्ही सत्तेवर आलात आणि तुम्ही आम्हाला विसरता, असा सवाल साबणे यांनी अशोक चव्हाण यांना केला.
आमच्या नेत्यांचे फोटो बॅनर वर देखील लावले जात नाहीत. आणि त्यामुळे आमच्या कार्यकर्त्याने काळे झेंडे दाखवले तर त्यांना बुटासह मारण्याचा प्रयत्न झाला, असं साबणे म्हणाले. आमच्या सदस्यांना डीपीडीसी मधून निधी दिला जात नाही, असा आरोप देखील त्यांनी केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App