भाजपाध्यक्ष नड्डा यांच्या ताफ्यावर बंगालमध्ये हल्ला; कारवर तुफान दगडफेक

  • मानवाधिकारावर ममतांच्या ट्विटनंतर काही वेळातच हिंसक राजकारणाचे स्वरूप उघडे कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी जात असताना हल्ला

वृत्तसंस्था

डायमंड हार्बर : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एकीकडे मानवाधिकार दिनानिमित्त लोकशाहीच्या कळवळ्याचे ट्विट केल्यानंतर काही वेळातच बंगालमधील हिंसक राजकारणाचा विद्रुप चेहरा पुढे आला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या मोटारींच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे.  stone pelted at jp nadda

 

पश्चिम बंगालमध्ये दोन्ही नेते कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी चालले असता ताफ्यातील त्यांच्या गाड्यांवर हल्ला करण्यात आला. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नड्डा यांच्या ताफ्यातील वाहनांवर तुफान दगडफेक करण्यात आल्याचा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केला आहे. २०२१ मधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे पी नड्डा कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी पोहोचले होते.

stone pelted at jp nadda

 

 

कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावरही हल्ला करण्यात आला असून दगडफेक करण्यात आली आहे. कैलाश विजयवर्गीय यांनी कारमधून प्रवास करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांचा ताफा जात असताना रस्त्यावर निषेध करत मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी होत असल्याचं दिसत आहे. तसंच दगडफेक करत गाडीच्या काचाही फोडल्याचे दिसत आहे. व्हिडीओमध्ये गाडीमध्ये आलेला दगडही त्यांनी दाखवला आहे.

 

 

“बंगाल पोलिसांना जे पी नड्डा यांच्या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली होती. पण पुन्हा एकदा बंगाल पोलीस अपयशी ठरली. पोलिसांसमोर तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली आणि माझ्या गाडीवर दगडफेक केली,” असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

याआधी दिलीप घोष यांनी बुधवारी नड्डा उपस्थित असणाऱ्या भाजपाच्या कार्यक्रमात योग्य सुरक्षा नसल्याचा आरोप केला होता. यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने पश्चिम बंगाल सरकारकडून सविस्तर अहवाल मागवला होता.

stone pelted at jp nadda

 

भाजपाने केलेल्या आरोपांवर तृणमूल काँग्रेसने उलटी प्रतिक्रिया व्यक्त केली असून पक्षाचे नेते मदन मित्रा यांनी म्हटलं आहे की, “त्यांचेच गुंड हिंसाचार करत आहेत”. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला आहे. दगडफेक हा सर्वसामान्यांना निषेध होता, असा दावा त्यांनी केला. दुसरीकडे टीएमसीचे नेते हकीम यांनी भाजपा बाहेरील लोकांना राज्यात आणत असून राज्य सरकारला याची माहितीही देत नसल्याचा आरोप केला आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*