Maharashtra SSC Result 2021 : दहावीचा निकाल रेकॉर्ड ब्रेक; ९९.९५ %


  • विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर

प्रतिनिधी

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १०वीच्या परीक्षा होऊ शकल्या नसल्या तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला निकाल आज जाहीर करण्यात आला. राज्याचा निकाल रेकॉर्ड ब्रेक लागला आहे. तो ९९.९५ % लागला आहे. std 10 result record break; 99.95%

शिक्षण मंडळाने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दुपारी एक वाजता विद्यार्थी निकाल ऑनलाइन पाहू शकणार आहेत. दहावीच्या निकालात कोकणाने बाजी मारली असून १०० % निकाल लागला आहे. राज्य माध्यमिक व उच माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत २०२१ मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर जाहीर करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला दहावी चा निकाल जाहीर आज शुक्रवारी जाहीर करण्यात आला. राज्यात नऊ विभागीय मंडळाने घेतलेल्या परीक्षेचा निकाल ९९.९५ % लागला आहे. सर्वात जास्त निकाल १०० % कोकण विभागाचा लागला असून सर्वांत कमी निकाल ९९.८४ % नागपूर विभागाचा आहे.

यंदा या परीक्षेसाठी आठ माध्यमांतील ९ लाख ९ हजार ९३१ मुले तर ७ लाख ७८ हजार ६९३ मुली असे एकूण १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थी प्रविष्ट होते. लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. मात्र करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ती रद्द करण्यात आली.

इयत्ता १०वीच्या परीक्षेत पास होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात किमान ३५ टक्के गुण आवश्यक असतात, मात्र अंतर्गत गुणांच्या मूल्यमापनावर २० टक्के गुण मिळणारे विद्यार्थीही उत्तीर्ण असतील. ज्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे त्यांना गुणपत्रक दिले जाईल जे विद्यार्थ्यांद्वारे त्यांच्या शाळांमधून दिले जाऊ शकते.

  •  ९९.९६ % विद्यार्थिनी उत्तीर्ण

सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थीनींचा निकाल ९९.९६ टक्के लागला असून विद्यार्थ्यांचा निकाल ९९.९४ टक्के आहे. विद्यार्थीनींच्या निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यांपेक्षा ०.०२ टक्क्यांनी जास्त आहे.

  •  २२ हजार ३८४ शाळांचा १०० % निकाल

राज्यातील २२ हजार ७६७ शाळांमधून १६ लाख ५८ हजार १६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २२ हजार ३८४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर राज्यातील नऊ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे.

राज्याचा निकाल ९९.९५ टक्के लागला आहे. शिक्षण मंडळाने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दुपारी एक वाजता विद्यार्थी निकाल ऑनलाइन पाहू शकणार आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in, mahahsscboard.in वर उपलब्ध होणार आहे. निकाल मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

  •  कोकणाची बाजी; १०० टक्के निकाल

राज्याच्या दहावीच्या परिक्षेत कोकण विभागाने बाजी मारली आहे. विभागाचा निकाल १०० टक्के लागला आहे. ३१ हजार १६८ विद्यार्थ्यांपैकी सर्वच विद्यार्थी परीक्षेत पास झाले आहेत. त्यामुळे विभागाचा निकाल १०० टक्के लागले आहे.

  •  ९५७ विद्यार्थ्यांना १०० % गुण

गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी ५ टक्के जास्त विद्यार्थ्यांना यावेळी १०० टक्के गुण मिळाले आहेत. २०२१ च्या दहावीच्या परीक्षेत ९५७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. तर ८३ हजार ९६२ विद्यार्थ्यांना ९० टक्के पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत.

std 10 result record break; 99.95%

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात