विशेष प्रतिनिधी
सिंधुदुर्ग : राज्याला मुख्यमंत्रीच राहिलेला नाही. अधिवेशन सुरु असताना मुख्यमंत्री गायब आहेत. मग चार्ज कुणाकडे दिला आहे, असा सवाल भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला. मुंबईत राज्य विधानसभेचे अधिवेशन सुरु झाले आहे. पण, आजारपणाने मुख्यमंत्री हजर राहिले नाहीत. त्या पार्श्वभूमीवर राणे बोलत होते. state has no Chief Minister
ते म्हणाले, जनता खडबडीत रस्त्यावर, जनता खड्ड्यात आणि राजाचे रस्ते गुळगुळीत. आम्ही रस्त्यासाठी पैसे मागतो तेव्हा पैसे नाहीत, असे आम्हाला सांगितल जातं.सीएमसाठी पण वर्षा ते विधानसभा रस्ता गुळगुळीत होतो. हेच तर महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. म्हणजे जनतेने आपली काळजी स्वतः घ्यावी.
पण, सगळी काळजी ही फक्त एका कुटुंबीयांसाठी घेतली जात आहे.आमच्या राज्याला मुख्यमंत्रीच राहिलेला नाही.राज्याचे अधिवेशन सुरू आहे आणि मुख्यमंत्री दिसत नाहीत म्हणजे राज्य नेमकं चालवत कोण आहे?राज्याचा चार्ज कोणाकडे दिला आहे हे आम्हाला माहीत नाही. रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करणार आहेत, अशी चर्चा आहे ते तरी जाहीर करा.स्वपक्षाच्या एक ही नेत्यावर ठाकरे कुटुंबीयांचा विश्वास राहिलेला नाही.अशा अवस्थेत अधिवेशनाच्या माध्यमातून जनतेला न्याय कसा मिळणार?
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App