WATCH : एसटी कर्मचाऱ्यांची स्वाक्षरी मोहीम सांगलीत एका दिवसात हजार नागरिकांच्या स्वाक्षऱ्या


विशेष प्रतिनिधी

सांगली – सांगलीत एसटी संपाच्या १२ व्या दिवशी प्रवाशांच्या पाठिंब्यासाठी आंदोलक कर्मचाऱ्यांनी स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. विशेष म्हणजे एका दिवसात एक हजार प्रवाशांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे आता एसटी आंदोलनात अप्रत्यक्ष जनताही सहभागी होत आहे.ST staff Signature campaign in sangali

एसटीचे राज्य शासनात विलनिकरण व्हावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या पाठिंब्यावर कामबंद आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या बाराव्या दिवशी सांगलीतील एसटी आंदोलकांनी प्रवासी आणि जनतेच्या पाठिंब्यासाठी सांगलीत सह्यांची मोहीम सुरू केली आहे.

या मोहिमेत एकाच दिवसात एक हजार प्रवासी नागरिकांनी सह्या करत एसटी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत संप लवकर मिटवला पाहिजे अशी भूमिका मांडली आहे. सांगली जिल्ह्यातून जास्तीजास्त सह्यांचे निवेदन हे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना पाठवले जाणार आहे.।एसटी आंदोलनात सह्यांच्या रूपाने आता थेट जनताही उतरली असल्याने सरकारने आता याची दखल घ्यावी अशी मागणी पुढे येत आहे.

– एसटी कर्मचाऱ्यांची स्वाक्षरी मोहीम

– आंदोलनाला जनतेचा मोठा पाठींबा

– दिवसात हजार जणांच्या स्वाक्षऱ्या

– सांगलीत स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे.

– सह्यांचे निवेदन राज्यपाल, मुख्यमंत्री यांना पाठवणार

– सह्यांच्या रूपाने आता थेट जनताही आंदोलनात

ST staff Signature campaign in sangali

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी