बॉलीवूड अभिनेता सोनू सूद म्हणाले की “आज मला लाखो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची संधी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यापेक्षा मोठी सेवा नाही. मला खात्री आहे की आम्ही एकत्र काम करू.”Sonu Sood to become brand ambassador for Delhi govt’s ‘Desh Ke Mentor’ initiative for school kids
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अभिनेता सोनू सूद दिल्ली सरकारच्या ‘देश के मेंटॉर’ कार्यक्रमाचे ब्रँड ॲम्बेसेडर बनले आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, “सोनू सूदजी आमच्या ‘देश के मेंटॉर’ कार्यक्रमाचे ब्रँड ॲम्बेसेडर बनण्यास सहमत झाले आहेत, हा उपक्रम लवकरच सुरू होईल.” संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी याची माहिती दिली.
याप्रसंगी अभिनेता सोनू सूद म्हणाले की, “आज मला लाखो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची संधी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यापेक्षा मोठी सेवा नाही. मला खात्री आहे की आम्ही एकत्र काम करू.”
चित्रपट अभिनेता सोनू सूदने शुक्रवारी सकाळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, राघव चड्ढा आणि इतरही नेते उपस्थित होते. या दोघांची औपचारिक भेट होती.
मात्र, ही बैठक पंजाब निवडणुकीशी संबंधित असू शकते, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. पंजाबात आम आदमी पक्षाला सोनू सूदच्या प्रसिद्धीचा फायदा मिळू शकतो, असाही तज्ज्ञांचा अंदाज आहे.बॉलीवडू अभिनेता सोनू सूद यांनी कोरोना काळात एक मसिहा म्हणून कार्य केले आहे. लॉकडाऊनमुळे लाखो स्थलांतरित मजुरांना आपल्या घरी पायी जावे लागले होते.
अशा वेळी सोनू सूद यांनी पुढाकार घेऊन अशा मजुरांना आपल्या पातळीवर शक्य ती सर्व मदत केली. खाण्यापासून ते घरी नेण्यापर्यंत सोनू सूद यांनी बस, ट्रेनमध्ये तिकिटांची व्यवस्था केली. तेव्हापासून सोनू सूद यांना सोशल मीडियावर सातत्याने विविध प्रकारच्या मदतीसाठी विनंत्या येत आहेत.
त्यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लोकांना ऑक्सिजन व इतर सुविधा पोहोचवून खूप मदत केली.
केजरीवाल आणि सोनू सूद यांच्या बैठकीचा अजेंडा स्पष्ट नाही, परंतु ही बैठक केजरीवाल सरकारच्या घोषणेच्या एक दिवसानंतर होत आहे, ज्यात असे म्हटले होते की दिल्ली सरकार लवकरच देशाचे सर्वात प्रगतिशील चित्रपट धोरण आणणार आहे. केजरीवाल सरकारने म्हटले आहे की, त्यांच्या सरकारच्या नवीन चित्रपट धोरणाचा मनोरंजन विश्वाला मोठा फायदा होईल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App