सोनिया गांधी यांनी काढली कॉंग्रेस नेत्यांची लाज, उध्दव ठाकरेंना विचारले आमचे लोक सतावत तर नाहीत ना?

कॉंग्रेसच्या नेत्यांची खोड माहित असल्याने पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनीच राज्यातील कॉंग्रेस नेत्यांची लाज काढली आहे. राज्यातील सरकार कसे चालले आहे, विचारताना आमचे नेते सतावत तर नाहीत ना? असे त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना विचारले.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कॉंग्रेसच्या नेत्यांची खोड माहित असल्याने पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनीच राज्यातील कॉंग्रेस नेत्यांची लाज काढली आहे. राज्यातील सरकार कसे चालले आहे हे विचारताना आमचे नेते सतावत तर नाहीत ना? असे त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना विचारले. sonia gandhi latest news

महाविकास आघाडी सरकारच्या कामगिरीवर आधारित पुस्तिकेच्या प्रकाशन प्रसंगी स्वत: उध्दव ठाकरे यांनी हा गौप्यस्फोट केला. विशेष म्हणजे यावेळी शरद पवार यांच्यासह राज्यातील सर्व प्रमुख कॉंग्रेस नेते उपस्थित होते. sonia gandhi latest news

ठाकरे म्हणाले की, कॅबिनेट काय असतं ते मला मुख्यमंत्री पदावर आल्यानंतर कळतंय, मला सवार्चं सहकार्य लाभतंय. यामागे शरद पवार आणि सोनिया गांधी यांचे मार्गदर्शन महत्वाचे आहे. सोनियाजी फोन करून विचारतात काम कसं चाललय याची विचारपूस करतात. ‘हमारे लोग सताते तो नहीं ना?असंही त्या विचारतात. मग मी तिथे तुमची (कॉंग्रेस) बाजू लावून धरतो आणि राष्ट्रवादीपेक्षा जास्त नाही असं म्हणतो. sonia gandhi latest news

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा वरचष्मा आहे. मात्र, कॉंग्रेसला या मंत्रीमंडळात फारशी किंमत दिली जात नाही. त्यामुळे कॉंग्रेसचे मंत्री सातत्याने तक्रारी करत असतात. राज्यातील वीजबिलाच्या प्रश्नावर उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी आपल्याला निधी मिळाला नाही, अशी तक्रार केली होती. त्यानंतर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही कॉंग्रेसच्या मंत्र्यांकडे असलेल्या विभागांना निधी दिला जात नाही, अशी तक्रार केली होती.

sonia gandhi latest news

त्याचबरोबर मराठा समाजातील तरुणांच्या विकासासाठी स्थापन केलेल्या सारथी संस्थेचा कार्यभारही कॉंग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून काढून घेण्यात आला होता. राज्यातील नेत्यांची ही नाराजी असताना आपण त्यांना किंमत देत नसल्याचे दाखवून देताना उध्दव ठाकरे यांनी जाणून बुजून सोनिया गांधी यांच्याशी आपला संवाद सुरू असतो, असे दाखवून दिले आहे, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.a

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात