विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद: औरंगाबादमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ४० वर्षीय आईने तिच्या 52 वर्षीय प्रियकराला स्वतःच्या 17 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात मदत केल्याचा आरोप आहे. अल्पवयीन पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
पीडितेने सांगितले की, काही काळापूर्वी तिचे आई आणि वडील त्यांच्यातील मतभेदांमुळे वेगळे राहू लागले. ती आणि तिचा धाकटा भाऊ आईसोबत राहिले आईचे आरोपी पुरुषाशी प्रेमसंबंध होते.
ऑगस्ट 2020 मध्ये, आरोपी तिच्या आईशी बोलण्यासाठी त्यांच्या घरी आला. त्याच दिवशी तिच्या भावाला आईने नातेवाईकाच्या घरी पाठवले.
आरोपीने त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले ,धक्कादायक म्हणजे तिच्या आईने तिला आरोपीच्या म्हणण्यानुसार वागण्यास सांगितले .
या घटनेनंतर आरोपीने तिच्यावर दोन वेळा बलात्कार . शिवाय, गुन्ह्याची कोणाला माहिती देऊ नका, अशी धमकीही त्याने तिला दिली.
तरुणीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिला कुठेही आसरा मिळाला नाही. त्यामुळे ती परत आली. यानंतर तिच्या आईने हा जघन्य गुन्हा गुंडाळून ठेवण्याच्या उद्देशाने आरोपीसोबत तिचे लग्न लावून देण्याचा प्रयत्न केला. मुलीने नंतर चाइल्ड हेल्पलाइनवर कॉल केला, त्यानंतर तिची सुटका करण्यात आली.
पोलिसांनी, अल्पवयीन पीडितेच्या बयानाच्या आधारे, संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आणि तिच्या आईला आणि तिच्या प्रियकराला अटक केली. बुधवारी अटक केलेल्या दोघांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App