विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी फेसबुकच्या 53 कोटी युजर्सचा डेटा ऑनलाईन पद्धतीने विकला गेल्याची बातमी समोर आली होती. सोशल मीडिया कंपनी फेसबुकने याप्रकरणी फेसबुकचे डायरेक्टर माईक क्लार्क यांनी स्पष्टीकरण देखील दिलं की युजर्सचा विकला गेलेला डेटा फेसबुकला हॅक करुन मिळवण्यात आलेला नाही. हॅकर्स कंपनीच्या सिस्टिममध्ये शिरले नव्हते, तर कॉन्टक्ट लिस्टमध्ये असलेल्या मित्रांचा शोध घेण्यासाठी असलेल्या काही ऍप्सचा वापर करत 50 कोटींपेक्षा अधिक युजर्चचा डेटा मिळवण्यात आलाय.मात्र हे स्पष्टीकरण न पटणार असं आहे.Shocking! Facebook data leaks; Sold data of 53 crore users online; Facebook’s practice; metropolitan on radar
100 देशांमधील 53 कोटी युजर्सचा डेटा लीक झालाय. लीक झालेल्या डेटामध्ये युजरचं नाव, जेंडर, व्यवसाय, विवाहित आहे की नाही, रिलेशनशिप स्टेटस, ऑफिस जॉइन केल्याची तारीख इत्यादी माहितीचा समावेश आहे. मध्ये युजर्सच्या खासगी माहिती चोरण्यात आली आणि त्या इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आली. पहिल्यांदा 2019 मध्ये डेटा लीक झाला होता. त्याची विक्री टेलिग्रामवर प्रत्येक सर्चसाठी 20 डॉलर इतक्या दराने होत होती.
गेल्या वर्षी जून 2020 आणि जानेवारी 2021 मध्ये पुन्हा डेटा लीक झाला होता. विशेष म्हणजे यावेळीही डेटा लीक आधीसारखाच सुरक्षेच्या त्रुटीमुळे झाल्याचं समोर आलं होतं. या डेटा लीकमुळे युजर्सना एखाद्या व्यक्तीचा नंबर सहज शोधता येतो हडसन रॉक या सायबर सिक्युरीटी फर्मचे सीईओ अॅलन गल यांनी पहिल्यांदा ही बाब निदर्शनास आणून दिली होती.
अफगाणिस्तानचे 5.5 लाख युजर्स, ऑस्ट्रेलियाचे 12 लाख युजर्स, बांगलादेशातील 38 लाख युजर्स, ब्राझीलमधील 80 लाख तर भारतातील 61 लाख युजर्सचा डेटा लीक झाला असल्याचा दावा गल यांनी केला .
डेटा लीकचे प्रकार रोखण्यासाठी भारतात सध्या तरही कोणतीच व्यवस्था नाही. डेटा संरक्षण आणि त्याचे उल्लंघन झाल्यास कारवाईची तरतूद नाही.
दावा काय आहे?
व्हाइस मदरबोर्ड या टेलिग्राम बॉटच्या म्हणण्यानुसार, युझरनेम, ई-मेल आयडी किंवा फोन नंबर अशा ज्ञात क्रेडेन्शियल्सचा वापर करून युझरची माहिती हॅकर्सकडून शोधली जाते.
जुन्या रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ‘अमेरिका, कॅनडा, यूके, ऑस्ट्रेलिया आदी देशांतल्या फेसबुक युझर्सचा डेटा लीक झाला आहे. एक माहिती साधारण 20 डॉलरला (म्हणजे 1500 रुपये) उपलब्ध होती. 10 हजार प्रकारची माहिती पाच हजार डॉलर्सला उपलब्ध होती.’
गल यांनी दिलेल्या ताज्या माहितीनुसार, हॅकर फोरमवर अमेरिकेतल्या 32 दशलक्ष, ब्रिटनमधल्या 11 दशलक्ष आणि भारतातल्या 60 लाख रेकॉर्ड्सची माहिती आहे.
महानगर रडारवर
इंडियन एक्सप्रेसने भारतीयांच्या लीक झालेल्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे, त्यानुसार भारतातील मोठ्या महानगरांना अधिक लक्ष्य केले गेले आहे. दिल्लीत 1.55 लाख, मुंबईत 1.36 लाख, कोलकातामध्ये 96 हजार, चेन्नईत 39 हजार डेटा लिक झाला आहे. याशिवाय हैदराबादमधील 48 हजार आणि बंगळुरुमधील 50 हजार लोकांच्या फेसबुक डेटालाही लक्ष्य केले आहे. भारतात ज्यांचे फेसबुक अकाउंट लक्ष्य केले गेले त्यात 49 लाख पुरुष आणि 12.5 लाख महिला आहेत.
वाढणार अपराध
फोन नंबर आणि सर्व माहिती लीक झाल्याने कोट्यावधी लोकांची गोपनीयता संपली आहे. सुरक्षा तज्ज्ञांचे म्हणणे आहे की या डेटाचा वापर लोकांना फसवण्यासाठी,स्पॅम मेसेजमध्ये पाठविण्यासाठी, मार्केटींग फोन आणि लक्ष्यित जाहिरातींसाठी केला जाऊ शकतो.
याशिवाय अनेक सेलिब्रिटींची माहितीही लीक झाली आहे. सुरक्षा तज्ज्ञ मिको हिप्पोन म्हणतात,याचा सर्वात मोठा फटका राजकीय तज्ञ, सेलिब्रिटीज यांना बसणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे युझर्सची पर्सनल माहिती अशी लीक झाली असेल, तर त्यांच्यावर सोफिस्टिकेटेड फिशिंग अॅटॅक होऊ शकतो. तो अॅटॅक झाला, तर फोटोज, बँकिंग डिटेल्स वगैरे सगळी माहिती खुली होऊ शकते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App