SHIVSENA VS VANCHIT BAHUJAN AAGHADI : प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुकीत १ हजार कोटी रुपये घेतले : शिवसेना ! हे तर शिवसेनेचा जुगार चालवून उदरनिर्वाह करतात : वंचित बहुजन आघाडी

विशेष प्रतिनिधी

हिंगोली : सध्या शिवसेना विरुद्ध वंचित बहुजन आघाडी वाद चांगलच रंगला आहे . एमायएम ठाकरे पवार सरकारमध्ये सामील होणार हे कळताच  हिंगोलीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांवर गंभीर आरोप करत त्यांनी निवडणुकीत १ हजार कोटी रुपये घेतल्याचं म्हटलं तर याला प्रत्युत्तर देताना शिवसेना आमदार संतोष बांगर जुगार चालवून उदरनिर्वाह करतात. बांगर यांना प्रौढ शिक्षण वर्गात दाखल करण्याची गरज आहे. बांगर महाराष्ट्रात कसे फिरतात ते बघूच असा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे .SHIVSENA VS VANCHIT BAHUJAN AAGHADI :

हिंगोलीत शिवसंपर्क अभियानादरम्यान आयोजित मेळाव्यात आमदार संतोष बांगर बोलत होते. “एमआयएम ही भाजपची बी टीम असून भाजपने त्यांना मत विभाजीत करण्यासाठी पुढे केलं आहे. गेल्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांच्या वंचितचाही याचसाठी वापर करण्यात आला. आंबेडकरांचे हात मजबूत करण्यासाठी, बौद्ध समाजाची मतं मिळवण्यासाठी हा प्रकार घडला. आंबेडकर यांना मागच्यावेळी १ हजार कोटी रुपये देण्यात आले. प्रचारासाठी मागच्या निवडणुकीत आंबेडकरांनी हेलिकॉप्टरने प्रवास करत सभा घेतल्या. हे हेलिकॉप्टर कुठल्या पैश्यातून आले, हे त्यांनी लोकांना सांगावं”.SHIVSENA VS VANCHIT BAHUJAN AAGHADI :

दरम्यान संतोष बांगर यांच्या वक्तव्याचे पडसाद उमटले आहेत
शिवसेना आमदार संतोष बांगर यांना अंकगणित आणि बाराखडीची पुस्तके उपलब्ध करून देऊन साक्षर करणार आहे. बांगर यांना बौद्ध समाजाची ताकद दाखवून देण्यासाठी वंचितच्या युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत. शिवसेनेचा जुगार चालवून उदरनिर्वाह करणाºया संतोष बांगर या आमदारांनी अकलेचे तारे तोडले आहेत असेही वंचित बहुजन आघाडीने म्हंटले आहे .

SHIVSENA VS VANCHIT BAHUJAN AAGHADI :

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात