महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन एक वर्ष उलटत असताना आता शिवसेना आणि राष्ट्रवादीने कार्यकर्त्यांचे भले करण्यासाठी पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. देवस्थानच्या डोळा ठेऊन राज्यातील मंदिरे शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून वाटून घेतली जाणार आहेत.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन एक वर्ष उलटत असताना आता शिवसेना आणि राष्ट्रवादीने कार्यकर्त्यांचे भले करण्यासाठी पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. देवस्थानच्या उत्पन्नावर डोळा ठेऊन राज्यातील मंदिरे शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून वाटून घेतली जाणार आहेत. shivsena rashtravadi news
राज्यातील देवस्थान समित्या बरखास्त करून तेथे महाविकास आघाडीच्या नेत्यांची वर्णी लावण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीनेच डल्ला मारला असून कॉंग्रेसला बाजुला ठेवले आहे. त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती राष्ट्रवादी पक्षाला मिळणार आहे. मुंबईतील सिद्धविनायक मंदिर शिवसेनेकडेच राहणार आहे. shivsena rashtravadi news
विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता संपताच या महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात येणार आहेत. यामुळे त्यावर वर्णी लागावी म्हणून इच्छूकांकडून सध्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, सिद्धविनायक मंदिर न्यास मुंबई व विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती पंढरपूर अशी महत्त्वाची महामंडळे आहेत.
या महामंडळाच्या अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे. गेल्या वर्षी महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर सरकारने अनेक महामंडळे बरखास्त केली. पण देवस्थान समित्यामध्ये मात्र कोणताही बदल केला नाही. आता मात्र या समित्या लवकरच बरखास्त करण्यात येणार आहेत.
भाजपच्या ताब्यातील देवस्थान समित्या काढून घेण्यासाठी गेले महिनाभर राज्यपातळीवर हालचाली सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आघाडीतील मित्रपक्षांनी या समित्या वाटून घेतल्या आहेत. पंढरपूर देवस्थान समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी यापूर्वीच राजीनामा दिला आहे. सध्या त्याचा कारभार सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसीकर महाराज पाहत आहेत. काँग्रेसला कोणते महामंडळ द्यायचे याबाबत सध्या अंतिम चर्चा सुरू आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष भाजपचे आहेत. ही समिती बरखास्त करण्यात येणार असून नवीन अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे जाणार आहे. दोन वषार्पूर्वी या समितीची विभागणी करून करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई ही नवीन समिती स्थापन करण्यात आली. पण ती कागदावरच राहिली. आता या समितीवर पदाधिकारी नियुक्त करण्याच्या हालचाली आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App