Shivsena – NCP – Congress : आधी पेंग्विन, म्याऊं म्याऊं झाले; आता महाराष्ट्राचे राजकारण नवरा – बायको – बाप – वर्‍हाडींवर आले!!

नाशिक : आधी पेंग्विन, म्याऊं म्याऊं झाले नंतर साप मुंगसाच्या उपमा देऊन झाल्या… महाराष्ट्राचे राजकारण बराच काळ “प्राण्यांमध्येच” रेंगाळले होते…!! महाराष्ट्रात माणसे नव्हे, तर प्राणीच राजकारण करत आहेत असे भासू लागले होते…!! पण आता महाराष्ट्राचे राजकारण नवरा – बायको – बाप वर्‍हाडींवर आले आहे…!! म्हणजे “माणसांमध्ये” आले आहे…!! Shivsena – NCP – Congress in maharashtra politics

शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील मतभेदांना मधून विधानसभेच्या पायऱ्यांवर नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना पाहून म्याऊं म्याऊंचे आवाज काढले. शिवसेनेच्या वाघाला मांजर असे चिडवून घेतले. मध्येच पेंग्विनचा विषय काढून सगळे राजकारण जणू महाराष्ट्रात माणसांपेक्षा वेगवेगळे प्राणीच करत आहेत, असे भासू लागले…!!

पण त्या पलिकडे जाऊन महाराष्ट्राचे राजकारण आता “माणसांमध्ये” आले आहे. शिवसेना-भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांचे नेते एकमेकांना “माणसांच्या” उपमा देऊन टोमणे हाणू लागले आहेत…!! भाजपचे नगरचेचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना टोचताना राष्ट्रवादीला नवरा शिवसेनेला बायको आणि काँग्रेसला वऱ्हाडी म्हणून डिवचून घेतले. त्याला प्रत्युत्तर देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बाप शब्द काढला…!! काँग्रेस “बाप” होती आणि “बापच” राहणार, असे उद्गार त्यांनी काढले, तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुजय विखे पाटील यांचे वक्तव्य दखल घेण्याजोगे नाही असे सांगून त्यांना झटकून टाकले. पण यशवंत जाधव यांच्या प्रकरणावर मात्र अजितदादांनी “आवर्जून” प्रतिक्रिया दिली. काही जण स्वतःच्या आईला मातोश्री म्हणत असतील प्रसार माध्यमे त्यांना कशाला उकळी देत आहेत?, असा खोचक सवाल अजितदादांनी केला.

– राजकारण “माणसांमध्ये” आले!!

पण एकूण शिवसेना आणि नारायण राणे यांच्या वादामुळे प्राण्यांच्या विश्वात गेलेले महाराष्ट्राचे राजकारण निदान सुजय विखे पाटील यांच्या वक्तव्यामुळे आणि त्यावर नाना पटोले, अजितदादा पवार यांनी दिलेल्या प्रत्युत्तरांमुळे माणसांमध्ये तरी आले हेही नसे थोडके!!

Shivsena – NCP – Congress in maharashtra politics

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात