आमटे कुटुंबात मुलगा-मुलगी भेदभाव?; बदनामी, एकटे पाडल्यामुळेच डॉ. शीतल यांची आत्महत्या?

  • शीतल यांच्या सासऱ्यांचा आमटे कुटुंबाला पत्रातून तिखट सवाल

वृत्तसंस्था

मुंबई : आमटे कुटुंबियांच्या वारसासाठी मुलगा-मुलगी असा भेदभाव करण्यात येत होता का?, त्यातूनच डॉ. शीतल यांची बदनामी झाली का?, त्यांना आमटे कुटुंबातून एकटे पाडण्यात आले का?, असे गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहेत. Sheetal amte news डॉ. शीतल यांचे सासरे शिरीष करजगी सासू सुहासिनी करजगी यांनी आमटे कुटुंबीयांना खुले पत्र पाठवून काही गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत.

शीतल आमटे यांच्या आत्महत्येला दोन दिवस उलटल्यानंतर आता या आत्महत्येमागे कौटुंबिक संघर्ष आणि सत्तास्पर्धा असल्याचा आरोप शीतल आमटे यांच्या सासऱ्यांनी केला आहे. त्यांनी आमटे कुटुंबाला पत्र पाठवून काही प्रश्न उपस्थित केले आहेत. Sheetal amte news

आनंदवनाच्या व्यवस्थापनातील सत्तास्पर्धेमुळे शीतल यांना एकटे पाडले गेल्याचा आरोप करजगी यांनी केला आहे. शीतल यांचे मानसिक आरोग्य ठीक नसल्याची अफवा जाणीवपूर्वक पसरवली गेली का?, असा सवालही करजगींनी उपस्थित केला आहे.

या पत्रात करजगी म्हणतात, “शीतलने संस्थेच्या कामात खूप योगदान दिले आहे, असे तुम्हीच लिहिले आहे. मग जर शीतलला आज काही मानसिक ताण आणि नैराश्य आहे, तर तिला संभाळून आपुलकीने तिला जवळ न घेता, तिच्याशी न बोलता, तिला दूर का लोटले गेले?

कारण आनंदवनात सगळया लोकांची काळजी घेतली जाते. मग सख्ख्या मुलीबाबत असे का घडले? की यामागे आमटे कुटुंबाचा काही स्वार्थ आहे? डॉ. प्रकाश आमटेंना तर मुक्या प्राण्यांची भाषा कळते. ते त्यांच्याशी संवाद पण करतात. मग स्वतःच्या पुतणीशी संवाद साधता आला नाही त्यांना? सोशल मीडियावर बदनामी करण्याची गरज काय होती?”

घराण्याचा वारसदार पुरुषच असावा, ही मानसिकता कधी बदलणार?, असा महत्त्वपूर्ण गंभीर सवाल शिरीष करजगी यांनी पत्र लिहून उपस्थित केला आहे. ते म्हणतात, “कौस्तुभ आमटे ह्यास परत विश्वस्त समंडळावर घेतले. पण मला विचारावेसे वाटते की त्याला काढून का टाकले होते? खास गोष्ट म्हणजे ज्या सगळ्या ट्रस्टींनी त्याला काढून टाकले होते, त्यांनीच त्याला परत घेतले. तर आमच्यासारख्या असंख्य लोकांना हे विचारावेसे वाटते की त्याला ट्रस्टी म्हणून काढण्यामागचे कारण काय होते? आणि आता परत घेतले तर त्यांनी अशी काय विशेष कामगिरी केली?

Sheetal amte news

मागचा 4-5 वर्षांपासून तर कौस्तुभ आमटे यांचे नावही कुठे वाचण्यात आले नव्हते. इतक्या वर्ष तो होता कुठे? की आमटे कुटुंबिय देखील सर्वसामान्य माणसांप्रमाणे मुलगा (घराण्याचा वारस) आणि मुलीमध्ये फरक करतात? आज मी सर्वांना खुले आव्हान करतो की आनंदवनला जावे व शितल आणि गौतमने जे काम केले आहे ते स्वतःच्या डोळ्यांनी बघावे आणि मग काय ते ठरवावे. आमटेंसारख्या नावाजलेल्या लोकांनी पण मुलामुलींमधे फरक करावा, ही खरंच लाजीरवाणी गोष्ट आहे, नाही का ?” Sheetal amte news

या पत्राच्या शेवटी त्यांनी काही काव्यपंक्तींचा उल्लेख करून विकास आमटेंना प्रश्न विचारला आहे. “उंची न अपुली वाढते फारशी वाटून हेवा। श्रेय ज्याचें त्यास द्यावें, एवढें लक्षांत ठेवा। ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी। ती न कामी आपुल्या, एवढें लक्षांत ठेवा।

कौस्तुभ आमटेच्या बाबतीत वरच्या ओळी अगदी योग्य ठरतील. ज्या प्रचंड गतीने आणि डेडीकेशनने आजच्या तसेच मागच्या अनेक वर्षांपासून शितल – गौतमनी आनंदवनात काम केले आहे त्याला तोडच नाही. त्याबद्दल आम्हाला त्या दोघांचा खूप खूप अभिमान वाटतो.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात