विशेष प्रतिनिधी
मुंबई : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु झालेल्या संघर्षानंतर भारतील शेअर बाजारात मोठी घसरण झाली. मागील सलग सात ट्रेडिंग सेशनमध्ये घसरणीमुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे.Share Market Crashed: Russia-Ukraine war shakes stock market; Market closed with historic decline
बेंचमार्क इंडेक्स सेन्सेक्स (Sensex) 2702.15 अंकांनी किंवा 4.72 टक्क्यांच्या घसरणीसह 54529.91 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी (Nifty) 815.30 अंकांच्या किंवा 4.78 अंकांच्या घसरणीसह 16248 अंकांवर बंद झाला. शेअर बाजारातील सर्व इंडेक्ट आज लाल निशाणात बंद झाले. तर Tata Motors, IndusInd Bank, UPL, Grasim Indusries आणि Adani Ports या शेअर्सची सर्वाधिक नुकसान झालं.
निफ्टी बँकमध्ये 5.79 टक्क्यांची, निफ्टी आयटीमध्ये 4.59 टक्क्यांची, स्मॉलकॅपमध्ये 5.77 टक्क्यांची घसरण झाली
आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण….
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या घोषणेवेळी म्हणजेच 23 मार्च 2020 नंतर बाजारातील पॉइंट्सच्या दृष्टीने ही सर्वात मोठी घसरण आहे. कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेनंतर लॉकडाऊनच्या भीतीमुळे शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती.
युक्रेनमधील रशियन लष्करी कारवाईनंतर ब्रेंट क्रूडने 7 वर्षात प्रथमच 100 डॉलरचा टप्पा ओलांडल्याने मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. आजच्या घसरणीत गुंतवणूकदारांची 10 लाख कोटींहून अधिकचं नुकसान झालं आहे.
निफ्टी निर्देशांक हळूहळू कमी होत गेला आणि अखेरीस दिवसाच्या नीचांकी स्तरावर 16,247 च्या पातळीवर बंद झाला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App