दिल्लीतल्या बैठकीचा पवारांकडून पुण्यात खुलासा; एकाच वेळी सामूहिक नेतृत्वाची आणि काँग्रेसला बरोबर घेण्याची कसरत

वृत्तसंस्था

पुणे – ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दिल्लीतल्या ६ जनपथमध्ये मंगळवारी सायंकाळी झालेल्या बैठकीचा पवारांनी आज सायंकाळी पुण्यात खुलासा केला. एकाच वेळी त्यांनी सामूहिक नेतृत्वाची बात केली आणि काँग्रेसला बरोबर घेण्याची इच्छाही व्यक्त केली.sharad pawar says, no allience possible without congress, but insists on collective leadership

शरद पवारांनी पुण्यात राष्ट्रवादीच्या नव्या कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी दिल्लीत आपल्या निवासस्थानी मंगळवारी घेतलेल्या बैठकीसंबंधी बरेच खुलासे केले. बैठकीच्या दिवशी पवार पत्रकारांशी बोलले नव्हते. त्यावेळी माजीद मेमन यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. आज पुण्यात पवारांनी त्या बहुचर्चित बैठकीवर भाष्य केले.

तिसऱ्या आघाडीच्या नेतृत्वाचा चेहरा आपण आहात का, या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले, की राष्ट्रमंचाच्या बैठकीत तिसऱ्या आघाडीची कोणती चर्चाच झाली नाही. पण पर्यायी राजकीय ताकद उभी करण्याबाबत चर्चा झाली. काँग्रेसला बरोबर घेऊनच ही ताकद उभी करता येईल, असे मत मी बैठकीत मांडले. त्याचवेळी आपण सामूहिक नेतृत्व करून पुढची वाटचाल केली पाहिजे असे मला वाटते. हे उद्योग मी अनेक वर्षे केले आहेत. आता प्रत्येकाला एकत्र ठेवून त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम मी करेन.

महाराष्ट्रात काँग्रेस स्वबळावर लढायचे असे म्हणत असेल, तर मी त्याचे स्वागत करतो. प्रत्येक पक्षाला स्वतःची ताकद वाढविण्याचा अधिकार आहे. आम्ही देखील कधी स्वबळाची भाषा वापरत असतो, याची आठवण पवारांनी करून दिली.

sharad pawar says, no allience possible without congress, but insists on collective leadership

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात