विशेष प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेसचा नेतृत्वाबाबत आणि विशेषतः राहुल गांधींबाबत काँग्रेसने न मागताच सल्ले देऊन शरद पवार आणि संजय राऊत हे दोन्ही नेते काँग्रेसला ठाकरे सरकारचा पाठिंबा काढून घेण्याइतपत कडेलोटापर्यंत खेचत नेत आहेत काय?, अशी शंका यावी अशी विधाने या दोन्ही नेत्यांनी केली आहेत. congress news
माजी खासदार विजय दर्डा यांना लोकमतसाठी दिलेल्या मुलाखतीत भले पवारांनी दर्डा यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर म्हणून राहुल गांधींच्या नेतृत्वातील सातत्याविषयी टीकाटिप्पणी केली असेल, पण ही टीकाटिपणी काँग्रेस नेत्यांना टोचावी या हेतूनेच केली होती काय?, अशी शंका उत्पन्न होत आहे. congress news
पवारांनी केलेल्या टिपणीवर काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आणि मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज प्रत्युत्तर दिले. खरेतर हा विषय तेथे संपायला हवा होता. परंतु हा विषय तेथेच थांबला नाही. ठाकूर यांच्या ट्विटवर पवारांनी थेट उत्तर दिले नाही. पण संजय राऊतांनी पुढे येऊन ते उत्तर दिले. संजय राऊत म्हणाले, की काँग्रेसने पवारांचे मार्गदर्शन स्वीकारले पाहिजे. ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचे अनुभवाचे बोल काँग्रेसने स्वीकारून राहुल गांधींचे नेतृत्व बळकट करावे, असा न मागता सल्ला त्यांनी देऊन टाकला.
इकडे खुद्द पवार यांच्या विधानातून काँग्रेस नेते दुखावले गेलेत. त्यांनी इशाराही देऊन झाला. तेथे विषय संपविण्याऐवजी पवार समर्थक संजय राऊत पुढे आले त्यांनी काँग्रेसला सल्लागारी करून हा विषय चर्चेत राहील याची राजकीय बेगमी केली. पवारांच्या पुढे पाऊल टाकून राऊतांनी राहुल गांधींच्या नेतृत्वावर टीकाटिप्पणी केली. त्याचबरोबर काँग्रेसला न मागता अनेक सल्लेही देऊन टाकले.
या सगळ्यातून पवार आणि राऊत यांच्या टीकाटिपणीवर राजकीय वर्तुळात शंका उत्पन्न केली जात आहे. हे दोन्ही नेते महाआघाडी सरकारचे स्थिरस्थावर होण्याच्या वातावरणात काँग्रेसला मुद्दामून डिवचत आहेत काय? की जेणेकरून काँग्रेस नेत्यांनी काही राजकीय हालचाली कराव्यात आणि हे सरकार अस्थिर ठेवावे. पवार आणि राऊतांचे हे धोरण आहे काय, ती काँग्रेस नेतृत्वाविषयी टिपणी करून ते काँग्रेसला एवढे चिडीला आणून ठेवायचे की त्यांनी पाठिंबा काढून घ्यावा. त्यातून सरकार अस्थिर केल्याचे खापर राष्ट्रवादीवर फुटणार नाही आणि आपले कामही साध्य होईल.
…या शंका बळकट होऊ लागल्या आहेत.
विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला बुस्टर डोस मिळाला असला तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आसन त्यातून स्थिर होत आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर स्थिरावणे हे पवारांना कसे चालेल? ठाकरे जेवढे स्थिरावतील, तेवढे पवारांचे मनसूबे लांबत जातील. त्यामुळे ठाकरेंचे आसन कायम अस्थिर ठेवण्यासाठी पवारांची राऊतांच्या सहाय्याने ही चाल तर नाही ना, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App