
राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा जेवढा जीव तुटला, तेवढा अनिल देशमुख किंवा फार पूर्वी छगन भुजबळ यांना अटक झाली तेव्हा तुटला नव्हता…!! याचा अर्थ शरद पवारांनी तेव्हा अटके विरोधात प्रतिक्रिया व्यक्त केल्या नव्हत्या, असे नाही. पण ज्या तीव्रतेने नवाब मलिक यांच्या अटकेवर शरद पवारांनी प्रतिक्रिया व्यक्त केली तेवढी तीव्र प्रतिक्रिया त्यांनी त्या वेळी व्यक्त केली नव्हती, ही वस्तुस्थिती आहे.Sharad Pawar M M card: Pawar playing “Maratha Muslim Card”; What is the solution for Shiv Sena
प्रतिक्रिये पलिकडचे राजकारण!!
पण पवारांचे हे राजकारण एवढ्या प्रतिक्रियेपुरते मर्यादित नाही. ते त्या पलिकडचे आहे. नवाब मलिक यांच्या अटकेनंतर शरद पवारांनी ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस ऍक्टिव्हेट केली, याचा अर्थ पवार आता “डबल एम कार्ड” खेळायला लागले आहेत. आता पवारांना “मराठा – मुस्लिम कार्ड” महाराष्ट्रात उघडपणे खेळायचे आहे.
- Sharad Pawar : शरद पवार यांना कोरोनाची लागण, देशभरातील दिग्गज नेत्यांकडून लवकर बरे होण्याची सदिच्छा!
संभाजीराजेंचे आंदोलन
संभाजी राजेंच्या मराठा समाजाविषयीच्या मागण्या मान्य करून पवारांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. संभाजीराजे यांनी देखील आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी मुस्लिम समाजाचे आभार मानले आहेत…!! पण त्यापूर्वीच पवारांनी नवाब मलिक यांच्या निमित्ताने “मुस्लिम कार्ड” देखील खेळायला सुरुवात केली आहे.
हीच एक प्रकारे पवारांची “डबल एम कार्ड” खेळीची सुरुवात आहे. मराठा समाजाला राष्ट्रवादी भोवती एकवटणे आणि त्याला मुस्लिम जोडून घेणे ही पवारांची खेळी दिसते आहे…!! हा भाजपपेक्षा शिवसेना आणि काँग्रेस यांना पवारांचा काटशह आहे. पवारांच्या संभाव्य “मराठा – मुस्लिम कार्डा”मुळे भाजपपेक्षा काँग्रेसला आणि शिवसेनेला फटका बसणार आहे.
मुलायमसिंग यांचे अनुकरण
हे एक प्रकारे पूर्वी मुलायमसिंह यादव यांनी उत्तर प्रदेशात “एम वाय कार्ड” खेळण्याचा जो प्रयत्न केला होता, तसेच आहे. त्यावेळी मुलायम सिंग यांचे “मुस्लिम – यादव कार्ड” अर्थात “एम वाय कार्ड” चालून गेले. समाजवादी पक्षाला फार मोठे यश मिळाले. ते अखिलेश यादव यांना देखील त्या कार्डाच्या आधारावर मिळाले. पण 2017 मध्ये हे “एम वाय कार्ड” मोडून पडले.
अखिलेश यादव यांना 2022 च्या निवडणुकीत “एम वाय कार्डा”ला बाकीची जातीची कार्डे जोडावी लागली आहेत. पण एवढे करूनही अखिलेश यादव यांना उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत यश मिळेलच, याची गॅरंटी नाही.
शरद पवार 2022 मध्येच हे “डबल एम कार्ड” खेळू इच्छित आहेत, असे दिसते. नवाब मलिक यांच्या अटकेनंतर सर्व मुस्लिमांना दाऊदशी जोडू नका, असे ते म्हणालेत यातच सगळे आले…!! राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिक यांच्या समर्थनासाठी ठिक ठिकाणी शहरांमध्ये मोठी आंदोलने केली. तशी आंदोलने छगन भुजबळ किंवा अनिल देशमुखांसाठी राष्ट्रवादीने केली नव्हती. राष्ट्रवादीची ही आंदोलने पाहून औरंगाबादचे एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी नवाबभाईंसाठी आम्ही रस्त्यावर उतरू, असे जाहीर केले. इतकेच काय पण त्याआधी अजित पवार बाहेर, मग नवाब मलिक आत का?, असे असा सवाल असदुद्दीन ओवैसी यांनी ही विचारून झाला आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार आता “डबल एम कार्ड” खेळत असल्याचे अधिक स्पष्ट आणि अधोरेखित होत आहे.
आशीष शेलार यांची ऑफर
या पार्श्वभूमीवर आजच भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सरळ सरळ ऑफर देऊन टाकली. नबाब मलिक यांना तुम्ही मंत्रिमंडळातून काढून टाका. शरद पवारांचा दबाव झुगारा. आम्ही राजकारण न आणता तुम्हाला पाठिंबा देऊ असे ते म्हणाले आहेत. भाजप नवाब मलिक यांचा मुद्दा दाऊदशी जोडल्या खेरीज राहत नाही. दाऊदच्या विरोधातली कारवाई थंड पडताना दिसणार नाही. किंबहुना ती अधिक तीव्र होत जाईल. अशा स्थितीत भाजप 100% हिंदुत्ववादी कार्ड खेळेल आणि पवार “डबल एम कार्ड” खेळतील. पण यातून खरी राजकीय कोंडी होईल, ती शिवसेनेची…!!
दाऊद विरुद्ध असे गोपीनाथ मुंडे यांनी रान उठवले होते, तसेच बाळासाहेब ठाकरे यांची भाषणे देखील गाजली होती. किंबहुना दंगलीच्या वेळी मुंबई बाळासाहेबांमुळे वाचली होती. आता जर उद्धव ठाकरे नबाब मलिक यांची बाजू घेणार असतील किंवा शरद पवार यांच्या दबावाला बळी पडणार असतील, तर ते कोणत्या तोंडाने बाळासाहेब ठाकरे यांचा राजकीय वारसा देखील सांगू शकतील…??, हा खरा प्रश्न आहे…!!
त्यामुळे नवाब मलिक यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची भाजपची ऑफर कदाचित उद्धव ठाकरे यांच्यासाठी फार मोठी संधी आहे ती त्यांच्या राजकीय पथ्यावर पडू शकते. विरोधकांचा प्रचंड दबाव हे कारण देऊन ते नवाब मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करू शकतात. “बशर्ते” त्यांना पवारांचा दबाव झुगारावा लागेल. पण या निमित्ताने शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मात्र शिक्कामोर्तब 100 % टक्के होईल आणि एक प्रकारे जर पवार “मराठा – मुस्लिम” असे “डबल एम कार्ड” खेळणार असतील तर भाजपच्या हिंदुत्वात शिवसेनेलाही पुन्हा शिरकाव करून घेता येईल…!! पवारांच्या “डबल एम कार्डावर” हाच खरा तोडगा आहे. पण उद्धव ठाकरे तो स्वीकारतील का…?? हा प्रश्न मात्र ठळक आहे…!!
Sharad Pawar M M card: Pawar playing “Maratha Muslim Card”; What is the solution for Shiv Sena
महत्त्वाच्या बातम्या
- “राजकीय संशयकल्लोळ” : संभाजीराजे महाविकास आघाडी बरोबर येणार; अमित देशमुखांचे स्टेजवर उद्गार… नंतर मात्र सारवासारव!!
- व्यावसायिक सिलिंडरच्या दरात १०५ रुपयांची वाढ
- हिरोची ई-स्कूटर मार्चमध्ये लॉन्च होणार : कंपनीची पहिली ई स्कूटर ; ओला, ट्विएस, बजाजशी स्पर्धा
- Nawab Malik ED : ईडीच्या समन्सवर फराज मलिकने मागितली आठवड्याची मुदत; ईडीने फेटाळली विनंती!!; कोणत्याही क्षणी फराज गजाआड!!