नाशिक : शरद पवार “सिंह” आणि अजित पवार “वाघ’; पण दोघेही अडकलेत दोन महापालिकांच्या पिंजऱ्यात!!, अशीच राजकीय अवस्था शरद पवार आणि अजित पवारांची झाली आहे.
पिंपरी – चिंचवड महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने अजित पवारांनी भाजपच्या स्थानिक नेतृत्वाला झोडपून काढले. त्यातही त्यांनी प्रामुख्याने आमदार महेश लांडगे यांना टार्गेट केले. महेश लांडगेंनी सुद्धा अजित पवारांचा कुठलाही हिशेब बाकी ठेवला नाही. त्यांनी सुद्धा अजित पवारांच्या दादागिरीला तितक्याच कठोर शब्दांमध्ये ठोकून काढले. त्यामुळे पिंपरी चिंचवडची निवडणूक राज्यभर गाजली. भाजपचा एक आमदार पाच वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याशी दमदारपणे भिडतोय, अशी चर्चा राज्यभर सुरू झाली. यातून अजित पवारांचीच प्रतिमा हानी झाली. म्हणून मग अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (नसलेले) प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी महेश लांडगे यांना उत्तर द्यायला समोर आले. शरद पवार हे “सिंह” आणि अजित पवार हे “वाघ” आहेत. त्यामुळे आम्ही “लांडग्यांकडे” लक्ष देत नाही, अशा अलंकारिक भाषेत मिटकरींनी महेश लांडगे यांना प्रत्युत्तर दिले.
– “वाघ” आणि “सिंह” यांना भिडला “लांडगा”
पण हे प्रत्युत्तर देताना आपण शरद पवारांना “सिंह” आणि अजित पवारांना “वाघ” म्हटले, तरी एक “लांडगा” त्यांना भिडतो आहे आणि त्यांना जेरीस आणतो आहे, हे सत्य मात्र अमोल मिटकरी सांगायला विसरले.
– इतर 27 महापालिकांकडे दुर्लक्ष
शिवाय शरद पवार हे “सिंह” आणि अजित पवार हे “वाघ” असले, तरी ते पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन महापालिकांच्या पिंजऱ्यांमध्ये अडकलेत. ते दोघेही महाराष्ट्रातल्या इतर 27 महापालिकांच्या निवडणुकांकडे फिरकले सुद्धा नाहीत. इतकेच काय पण “सिंह” आणि “वाघ” यांच्या घराण्यातल्या सुप्रिया सुळे सुद्धा कुठल्याच महापालिकांच्या निवडणुकांमध्ये प्रचारात दिसल्या नाहीत. या राजकीय सत्याकडे सुद्धा अमोल मिटकरी यांनी सोयीसाठी दुर्लक्ष केले.
– “सिंह”, “वाघ” घराण्यातल्या सुप्रिया सुळे “गायब”
वास्तविक शरद पवार हे “सिंह” आणि अजित पवार हे खरे “वाघ” असते, तर त्यांनी महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांच्या क्षेत्रांमध्ये जाऊन प्रचाराचे रणकंदन घातले असते. सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी सुद्धा त्या रणकंदनात भाग घेतला असता. या सगळ्यांनी मिळून इतर सगळ्यांना सळो की पळो करून सोडले असते. पण तसे काहीच घडताना दिसले नाही. उलट रोहित पवारांनी तर त्यांच्या हातातली जामखेड नगरपालिका सुद्धा गमावली. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत नातेवाईकांनाच मतदार बनविल्याचा फटका त्यांना बसला. रोहित पवारांनी केलेल्या “उद्योगामुळे” मुंबई हायकोर्टाने ती निवडणूक स्थगित केली. त्यावेळी सिंह असलेले शरद पवार आणि वाघ असलेले अजित पवार रोहित पवारांच्या बचावासाठी पुढे येऊ शकले नाहीत.
– “वाघ”, “सिंह” करत बसले गौतम अदानींचे स्वागत
अमोल मिटकरी यांनी वर्णन केलेले “सिंह” आणि “वाघ” महाराष्ट्रात इतरत्र फिरायचे सोडून स्वतःच्या बारामतीत गौतम अदानींचे स्वागत करत बसले. त्यावेळी महाराष्ट्रातले देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे रवींद्र चव्हाण यांच्यासारखे नेते इतरत्र मुक्तपणे संचार करून आले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App