कायद्याचे ‘दिशा’ नाव बदलून शक्ती का केले? युवा कॅबीनेट मंत्री असला तरी निपक्षपातीपणे निकाल दिला जावा; नितेश राणे यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

आपले राज्य दिशा कायद्याअंतर्गत कारवाई करताना कोणत्याही खटल्यात भेदभाव करणार नाही अशी मला आशा आहे. अगदी युवा कॅबिनेट मंत्री, जे सध्या एक संशयित आहेत, त्यांच्यासंदर्भात जरी खटला असेल तरी त्याचा निकाल निपक्षपातीपणे दिला जाईल अशी माझी अपेक्षा आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : दिशा कायद्याचे नाव बदलून शक्ती ठेवण्यात आले आहे. मात्र, या कायद्यान्वये खटल्यात कोणताही भेदभाव होणार आहे. एका प्रकरणात संशयित असलेला युवा कॅबीनेट मंत्री असला तरी निकाल निपक्षपातीपणे दिला जाईल, असे म्हणत आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. shakti act nitesh rane aditya thackeray news

अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि त्याची पूर्वाश्रमीची मॅनेजर दिशा सालियन या दोघांच्या मृत्यूप्रकरणी भाजपा नेते नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र नितेश व निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंचे पुत्र आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर विविध आरोप केले. दिशा सालियन मृत्यूप्रकरणात आदित्य ठाकरे यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोपही नारायण राणे यांनी एका पत्रकार परिषदेत केला होता. याच पार्श्वभूमीवर नितेश यांनी म्हटले आहे की, आपले राज्य दिशा कायद्याअंतर्गत कारवाई करताना कोणत्याही खटल्यात भेदभाव करणार नाही अशी मला आशा आहे. अगदी युवा कॅबिनेट मंत्री, जे सध्या एक संशयित आहेत, त्यांच्यासंदर्भात जरी खटला असेल तरी त्याचा निकाल निपक्षपातीपणे दिला जाईल अशी माझी अपेक्षा आहे.

shakti act nitesh rane aditya thackeray news

नितेश राणे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकार शक्ती नावाचा नवा कायदा आणत आहे हे ऐकून मला आनंद झाला. या कायद्याचं आधीचं नाव दिशा होतं पण ते बदलून शक्ती ठेवण्यात आलं. कायद्याचं आधीचं नाव दिशा होते. ते काय बदललं हे समजू शकतो.
विधिमंडळाच्या १४ डिसेंबरपासून सुरू होणाºया अधिवेशनात दिशा कायद्यासाठी विधेयक मांडण्यात येणार आहे. या कायद्याअंतर्गत बलात्काराच्या गुन्ह्यात पंधरा दिवसात आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या परवानगीने त्यात फार तर पाच दिवसांची सवलत देण्यात येईल.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*