काँग्रेसचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद हे आपल्या अयोध्या विषयक पुस्तकात हिंदुत्वाची तुलना इस्लामिक कट्टरतावादी आणि हिंसक संघटना आयएसआयएस आणि बोको हराम यांच्याशी करून मोकळे झाले आहेत. त्याच वेळी त्यांनी महात्मा गांधी यांच्या सनातन हिंदु धर्माची स्तुती करताना राजकीय हिंदुत्वावर तीव्र आक्षेप घेतला आहे.Senior Congress leader Salman Khurshid compares Hindutva in his book on Ayodhya
सलमान खुर्शीद यांनी निखळ बुद्धिवादाने हा आक्षेप घेतला असता तर त्याला काही विशिष्ट अर्थ राहिला असता. शिवाय त्यांच्या बुद्धिमत्तेची बुरुजही राखली गेली असती. पण तसे घडलेले नाही. सलमान खुर्शीद यांनी हिंदुत्वाची तुलना कट्टर इस्लामी विचारसरणीशी करण्यामागे त्यांचे निखळ बुद्धिवादापेक्षा काही वेगळे हेतू आहेत.
…आणि त्यामुळेच एक प्रश्न पडतो हेच “ते” सलमान खुर्शीद आहेत का की जे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात अत्यंत प्रगल्भ असे परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री होते? आणि ज्यांनी त्यावेळचे विरोधी पक्षनेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त राष्ट्रसंघात जाऊन पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय पातळीवर राजनैतिक विजय मिळवला होता??
त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी आणि सलमान खुर्शिद यांनी एकमेकांना मिठी मारली असे फोटो भारतभरच्या प्रतिष्ठित मॅगझिन्सवर झळकले होते. सलमान खुर्शीद यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीची सर्व भारतीय माध्यमांनी त्यावेळी स्तुती केली होती. त्यावेळी हेच “ते” अटल बिहारी वाजपेयी होते यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी अत्यंत काव्यात्मक भाषेत वर्णन केले होते. तेव्हा सलमान खुर्शीद यांना अटलजींचे नेतृत्व मान्य होते, मग आता असे काय झाले? की ते अटलजींनी मान्य केलेल्या सावरकरांच्या राजकीय हिंदुत्वावर एकदम घसरले आहेत…??
सलमान खुर्शीद आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या राजकीय मतप्रणाली निश्चित भिन्न आहेत. यात कोणतीही शंका नाही. पण त्यावेळी जी राजकीय प्रगल्भता सलमान खुर्शीद यांनी दाखविली होती, ती राजकीय प्रगल्भता पुस्तक लिहिताना कुठे गेली आहे?? ज्या राजकीय हिंदुत्वाने कोणत्याही स्थितीत आणि कोणत्याही पातळीवर हिंसाचाराचे अजिबात समर्थन केलेले नाही त्या राजकीय हिंदुत्वाची तुलना उघडपणे हिंसाचाराचे समर्थन करणाऱ्या इस्लामी आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांची कशी काय होऊ शकते?? एवढे साधे भान देखील सलमान खुर्शीद यांच्यासारख्या त्यावेळच्या प्रगल्भ नेत्याला कसे काय राहिले नसेल??, हा खरा प्रश्न आहे.
सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकात हिंदुत्वाची आयएसआयएस आणि बोको हराम बरोबर तुलना; राजकीय क्षेत्रात वादळ, तक्रार दाखल
… की सलमान खुर्शीद यांची त्यावेळची राजकीय प्रगल्भता ही त्यावेळच्या त्यांच्या नेतृत्वाकडून अर्थात पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या कडून त्यांनी उसनी घेतली होती? आणि आता सलमान खुर्शीद यांचे राजकीय नेतृत्व बदलल्यानंतर म्हणजे नरसिंह राव यांच्या जागी सोनिया गांधी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे प्रतिष्ठित झाल्यानंतर सलमान खुर्शीद यांनी आपली राजकीय प्रगल्भता गमावली आहे?? नेमके काय घडले आहे?, याचे उत्तर खरे म्हणजे सलमान खुर्शीद यांच्याकडे मागितले पाहिजे.
सलमान खुर्शीद यांनी राजकीय हिंदुत्वाची तुलना इस्लामी दहशतवाद्यांशी करणे हे खरे म्हणजे त्यांच्या स्वतःच्या राजकीय प्रगल्भतेपेक्षा त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाच्या राजकीय प्रगल्भतेशी अधिक संबंधित असल्याचे दिसून येते. कारण जे सावरकरांनी कधीही म्हटलेच नाही, ज्याचे प्रतिपादन सावरकरांनी राजकीय हिंदुत्वात केलेच नाही ते सर्व आरोप सध्याचे काँग्रेस नेतृत्व सावरकरांवर आणि त्यांच्या हिंदुत्वावर करत असते. नेमकी त्याचीच री सलमान खुर्शीद यांनी आपल्या अयोध्या विषयक पुस्तकात ओढलेली दिसते आहे.
ही सलमान खुर्शीद यांची वैयक्तिक राजकीय प्रगल्भतेची घसरण तर आहेच, पण संपूर्ण काँग्रेसच्या सध्याच्या राजकीय निम्नस्तरीय बुद्धिमत्तेचे ती निदर्शक आहे. त्यातूनच सावरकरांनी न मांडलेल्या अनेक विचारांना त्यांच्यावर थोपवून हिंदुत्वावर टीकेची झोड उठविण्यात येत आहे.
आणि म्हणूनच वर उपस्थित केलेला मुद्दा अधिक अधोरेखित करावासा वाटतो तो म्हणजे “ते” सलमान खुर्शीद आणि “हे” सलमान खुर्शीद दोन्ही स्वयंभू किंवा स्वयंपूर्ण नाहीत, तर ते त्यांच्या नेतृत्वाच्या राजकीय बुद्धिमत्तेचे आश्रित आहेत. हे येथे आवर्जून नमूद करावेसे वाटते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App