वृत्तसंस्था
मुंबई : परप्रांतियांची नोंद ठेवण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य असंवेनशील आहे. प्रत्येक विषयावर राजकीय अस्मितेचा धंदा शिवसेनेने सुरु केला आहे, अशी टीका भाजप नेते आमदार ॲड आशिष शेलार यांनी केली. Shiv Sena should stop the business of political identity, Clarify the role of CAA, NRC; Demand of Ashish Shelar
ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याला आमचा शंभर टक्के आक्षेप आहे. गुन्हा आणि पीडितेबाबत असंवेदशीलता दाखवणार हे वक्तव्य आहे.
प्रत्येक विषयावर अस्मितेचा धंदा शिवसेनेने सुरु केला असून वाढत्या गुन्हेगारीवर बोलण्याऐवजी येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकांचे लक्ष वळवण्याचा हा प्रयत्न आहे. राष्ट्रीय नागरिक नोंदवहीला (NRC) शिवसेनेचा विरोध आहे.
मग परराज्यातील नागरिकांची नोंदवहीचा पुरस्कार कसा करता ? असा सवाल करत नौटंकी बंद करुन NRC, CAA बाबत शिवसेनेने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी ॲड.शेलार यांनी केली.
गुन्हेगारीवर बोलण्याऐवजी मुख्यमंत्री विघटनवादी भूमिका घेत आहेत, असे सांगत रिक्षाचा वापर झाला म्हणून परराज्यातील लोकांची नोंदवही, उद्या जर एसटीचा वापर झाला तर गावातल्या लोकांची नोंदवही करणार का? असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला. शिवसेनेने राजकीय अस्मितेचा धंदा बंद करुन गुन्हेगारीमुक्त मुंबईकडे लक्ष द्यावे, असा सल्ला त्यांनी दिला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App