स्वतंत्र वित्त सल्लागार हा सध्या गुंतवणुकीसाठी महत्वाचा घटक बनलेला आहे. वित्त सल्लागारांची रोजीरोटी त्यांनी ग्राहकांना देऊ केलेल्या गुंतवणूकविषयक उत्पादनांमधून मिळते. म्हणूनच आर्थिक गरजांप्रमाणे ते वैयक्तिक सेवा देऊ शकतात. त्यांचा अनुभव व व्यावसायिक कौशल्यांच्या आधारावर ते विविध स्तरांतील ग्राहकांना सल्ला देतात. प्रत्येक वित्त सल्लागाराची खासियत वेगळी असू शकते. कुणाला रियल इस्टेटमधील गती अधिक असू शकते, तर कुणी गुंतवणूक सल्लागार म्हणून माहीर असू शकतो, तर कुणी विमा नियोजनात आघाडीवर.Seek the help of a financial advisor before making a financial investment
थोडक्यात तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओचे व्यवस्थापन करण्यासाठी वित्त सल्लागाराची मदत घेऊ शकता. बदलत्या धोरणांमुळे भारतीय बाजारपेठेत वित्त नियोजकांची एक जमात उदयाला येऊ लागली. कर्जाचे व्यवस्थापन, गुंतवणूक-विमा तसेच कराविषयीचे नियोजन या साऱ्याचा विचार करून ग्राहकांना संकलित स्वरूपाचे आर्थिक नियोजन सुचवणे हे वित्त नियोजकांचे उद्दिष्ट असते.
उत्तम वित्त नियोजक तुमच्या गरजा लक्षात घेतो, तुमची आर्थिक उद्दिष्टे ठरवतो व भविष्यात या उद्दिष्टांचा वेध घेण्यासाठी तपशीलवार योजना तयार करतो. तुम्ही एखाद्या नियोजनबद्ध तसेच संकलित स्वरूपाच्या सेवेच्या शोधात असाल तर वित्त नियोजक तुम्हाला नक्कीच मदत करू शकतात. अनेक पांरपरिक वित्तीय उत्पादनांच्या विक्रीवर कमिशन ठरलेले असते. गुंतवणुकीच्या एकूण रकमेच्या ठराविक टक्के रक्कम कमिशन म्हणून मध्यस्थीला मिळते.
समजा तुम्ही १० हजार रुपये गुंतवणार आहात. ज्यावर ४ टक्के कमिशन मिळणार असेल तर प्रत्यक्षात ९६०० रुपये गुंतवले जातात व ४०० रुपयांचे कमिशन फीच्या स्वरूपात मध्यस्थीला मिळते. प्रत्येक वेळी तुम्ही गुंतवणूक केल्यावर काही टक्के वजा होतात. म्हणूनच कमिशनची राशी ही गुंतवणुकीची एकूण रक्कम व किती वेळेला केली त्याचा आकडा यावर अवलंबून असते. फीवर आधारित प्रकारात, मध्यस्थी देत असलेल्या सेवेबद्दल तुमच्याकडून काही रक्कम फी म्हणून आकारली जाते.
हे अधिक दर्जात्मक असून उत्पादन वा सेवा यांच्या स्वरूपावर अवलंबून असते. यासह वित्तीय उत्पादने बाजारात कशी कामगिरी करतात, त्या आधारावर ते फी आकारतात. त्यामुळे जर एखाद्या बाजाराशी निगडित उत्पादनाने चांगली कामगिरी केली तरच त्यावर आधारित फी घेतली जाते अन्यथा नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App