पंजाबमध्ये मुख्यमंत्री अमरिंदर सिंगांच्या घरासमोर अकाली दलाचा राडा; सुखबीर सिंग बादल पोलीसांच्या ताब्यात

वृत्तसंस्था

सिसवान – पंजाबमध्ये काँग्रेसच्या अमरिंदर सिंग सरकार विरोधातील जनक्षोभ प्रचंड वाढत असून त्याचे पडसाद आज सिसवानमध्ये उमटले. अमरिंदर सिंग यांच्या निवासस्थानासमोर अकाली दलाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. त्यावेळी पोलीसांनी त्यांच्यावर वॉटर कॅननमधून पाण्याचा मारा केला. Security forces use water cannon on the protesting Shiromani Akali Dal (SAD) leaders & workers outside the residence of CM Captain Amarinder Singh in Siswan.

अकाली दलाचे प्रमुख सुखबीरसिंग बादल यांना पोलीसांनी ताब्यात घेतल्यानंतर तर कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले आणि त्यांनी पोलीसांची बॅरिकेड्स तोडून अमरिंद सिंग यांच्या घराच्या दिशेने आक्रमक चाल केली. पोलीसांनी ताब्यात घेतल्यावर देखील सुखबीर सिंग यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अमरिंदर सिंग हे कितीही पोलीसबळ वापरू देत, जनतेचा आक्रोश मोठा आहे. हे तुफान उठले आहे आणि ते रोखणे अमरिंदर सिंग यांच्या शक्तीच्या बाहेरचे आहे, असे त्यांनी सांगितले.



सुखबीरसिंग बादल म्हणाले, की पंजाबमध्ये काँग्रेस सरकारने प्रत्येक क्षेत्रात घोटाळेच केले. लस खरेदीत घोटाळा, फतेह किट खरेदीत घोटाळा, मागासवर्गीय शिष्यवृत्त्यांमध्ये घोटाळा, मोठ्या प्रकल्पांसाठी जमीन व्यवहारात घोटाळा. प्रत्येक ठिकाणी अमरिंदर सिंगांच्या काँग्रेस सरकारचा घोटाळाच सापडेल. त्या विरोधात अकाली दल मैदानात उतरले आहे आणि जनतेचा प्रचंड पाठिंबा आम्हाला मिळतोय.

सिसवानमध्ये अकाली दलाचे निदर्शक लाखोंच्या संख्येने जमले होते. त्यांनी पोलीसांची फळी तोडली. त्यांनी रचलेली बॅरिकेड्स तोडली आणि अमरिंदर सिंग यांच्या निवासस्थानाच्या दिशेने आक्रमक चाल केली.

 

Security forces use water cannon on the protesting Shiromani Akali Dal (SAD) leaders & workers outside the residence of CM Captain Amarinder Singh in Siswan.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात