शाळेतील १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे नियोजनानुसार लसीकरण केंद्रावर उपस्थित राहून लसीकरण सुरू राहणार आहे.Schools in Mumbai will remain closed till January 31, Municipal Commissioner Iqbal Chahal said
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईतील वाढती कोरोना रुग्णसंख्या आणि ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता शहरातील इयत्ता १० वी. व १२ वी चे वर्ग वगळता अन्य वर्ग असणाऱ्या शाळा ४ जानेवारी २०२२ ते ३१ जानेवारी २०२२ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.याबाबत मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी माहिती दिली आहे.
दरम्यान इयत्ता १ ते इयत्ता ९ वी व इयत्ता ११ वी या वर्गातील विद्यार्थ्यांचे ऑनलाइन पद्धतीनं शिक्षण सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.तसेच शाळेतील १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे नियोजनानुसार लसीकरण केंद्रावर उपस्थित राहून लसीकरण सुरू राहणार आहे.
दरम्यान याकरीता महापालिका शाळांसह अन्य खासगी शाळांमधील लसीकरणास पात्र असणाऱ्या १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करुन घेण्यासाठी शाळेत बोलावता येणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App