राहुल गांधी यांना एका चौकडीने घेरलेले आहे. या चौकडीचे राहुल यांच्यावर नियंत्रण असल्याचा आरोप कॉंग्रेसचे माजी राष्ट्रीय प्रवक्ते संजय झा यांनी केला आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राहुल गांधी यांना एका चौकडीने घेरलेले आहे. या चौकडीचे राहुल यांच्यावर नियंत्रण असल्याचा आरोप कॉंग्रेसचे माजी राष्ट्रीय प्रवक्ते संजय झा यांनी केला आहे. Sanjay za accuses Rahul Gandhi of making a mess of people
झा यांचे द ग्रेट अनरेवलिंग: इंडिया आफ्टर 2014 या पुस्तकाचे लवकरच प्रकाशन होणार आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले की, व्यक्ती म्हणून राहुल गांधी चांगले असले तरी त्यांच्यात महत्वाचा दोष म्हणजे आवडीच्या लोकांचे कोंडाळे बनविण्याची त्यांना सवय आहे. हेच लोक त्यांना वाईट पध्दतीने वापरतात. त्यांच्यावर पूर्ण नियंत्रण मिळवितात. पक्षापेक्षा स्वत:चे हित साधण्यातच त्यांना स्वारस्य असते.
राहुल गांधी यांनी कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम करताना आपल्या विचारांना कधीही तार्किक पातळीवर तपासून पाहिले नाही. २०१९ मध्ये कॉंग्रेसचा दारुण पराभव झाला. यावेळी राहुल गांधी म्हणाले की ही लढाई मी एकट्याने लढली होती. परंतु, कोणत्याही पक्षाच्या नेत्याने हे बोलणे योग्य नाही. आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली लढलो होतो. त्यामुळे कृपया आपणच एकटे लढलो असे म्हणू नका, असेही झा यांनी सांगितले.
झा म्हणाले याउलट भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची कार्यपध्दती आहे. त्यांच्यामध्ये जिंकण्याची इर्षा असते. भाजपाचे नेते कार्यकर्त्यांत जोश निर्माण करतात. मोदींनाच पाहा. ते नेहमीच मोठा विचार करतात. त्यामुळे भाजपाचे कार्यकर्तेही मोठाच विचार करतात. भाजपा कोणतेही आव्हान घेण्यास तयार असते. भाजपकडे केवळ मोदी, शहाच नाहीत तर जे. पी. नड्डा आहेत, नितीन गडकरी आहेत, राजनाथ सिंह आहेत. त्यांनी अनेकांना पक्षाचे अध्यक्ष बनण्याची संधी दिली आहे. कॉंग्रेसचे नेते दिल्लीत बसून आहेत आणि जे. पी. नड्डा संपूर्ण देशात फिरत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App