Sanjay Vs Somaiyya : संजय राऊतांची अर्वाच्य शिविगाळ-किरीट सोमय्यांच्या पत्नी-आई-सून व्यथित… उध्दव ठाकरे राऊतांना का थांबवत नाहीत ?

संजय राऊतांकडून किरीट सोमय्या यांना जी अर्वाच्य भाषा वापरण्यात आली त्यानंतर किरीट सोमय्या यांच्या पत्नी आई आणि सून या तिघींना प्रचंड त्रास झाला आहे .


विशेष प्रतिनिधी

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत हे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर टीका करताना सातत्याने अर्वाच्य भाषेचा वापर करत आहेत. संजय राऊत यांनी ज्या शिव्या दिल्या आहेत त्यामुळे किरीट सोमय्या यांच्या कुटुंबातील महिला उद्विग्न झाल्या आहेत .Sanjay Vs Somaiyya: Sanjay Raut’s Abusive language -Kirit Somaiya’s wife-mother is upset …

आज (21 फेब्रुवारी) सोमय्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कठोर शब्दात संजय राऊतांना सुनावलं आहे.

संजय राऊत हे जी शिविगाळ करत आहेत त्यामुळे माझ्या कुटुंबातील माझी पत्नी, आई, सून या व्यथित झाल्या आहेत. असं म्हणत सोमय्यांनी राऊतांना सुनावलं आहे. उद्धव ठाकरे राऊत यांना का थांबवत नाहीत.

’19 बंगल्यांचा विषय काढला म्हणून मला जोडे मारण्याची भाषा.. दलाल पासून भXX पर्यंतची भाषा.. भXXचा अर्थ संजय राऊतला कळतो का? माझ्या बायकोला आणि माझ्या आईला जाऊन विचार. भXXचा अर्थ कळतो का संजय राऊतला? माझी बायको मराठी आहे. माझी सून बागायतकर.. महाराष्ट्रीयन आहे. अशा प्रकारची शिवी उद्धव ठाकरे हे संजय राऊततर्फे देतात. का? तर मी त्यांची चोरी, लबाडी, घोटाळे बाहेर काढतोय म्हणून?’

‘संजय राऊत हे जी शिविगाळ करत आहेत त्यामुळे माझ्या कुटुंबातील माझी पत्नी, आई, सून या व्यथित झाल्या आहेत. चार महिन्यांपूर्वी संजय राऊतांनी प्रचंड कौतुक केलं होतं. त्यांनी तसं पत्र देखील दिलं होतं.

पण आता संजय राऊतच्या कोव्हिड रुग्णालयाचा घोटाळा बाहेर आल्यानंतर दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठी मला शिव्यांची लाखोळी वाहत आहेत.

असं म्हणत सोमय्यांनी या सगळ्या प्रकाराबाबत आपला संताप व्यक्त केला आहे.

Sanjay Vs Somaiyya: Sanjay Raut’s Abusive language – Kirit Somaiya’s wife-mother is upset …