वृत्तसंस्था
मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविषयी शरद पवार यांनी केलेल्या विधानाने महाराष्ट्र काँग्रेसने नाराजीचा सूर आळवला आळवतात संजय राऊत काँग्रेसच्या सल्लागाराच्या भूमिकेत आले आहेत त्यांनी काँग्रेसला शरद पवारांचे म्हणणे मार्गदर्शन म्हणून स्वीकारावे असा सल्ला दिला आहे. sanjay raut news
“हे सरकार स्थिर राहावे असे वाटत असेल, तर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टीप्पणी करणे टाळावे,” असा इशाराच महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर यांनी शरद पवारांचे नाव न घेता मित्रपक्षांच्या नेत्यांना दिला होता. या नाराजीवर भाष्य करत संजय राऊत यांनी काँग्रेसला राजकीय सल्ला दिला आहे.
“राहुल गांधी हे काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत, पण ते काँग्रेसचे अध्यक्ष नाहीत. त्यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारावे आणि कामाला लागावे या मताचा मी आहे. हैदराबादमध्ये काँग्रेसची कामगिरी चांगली नाही. त्याउलट भाजपा ४ वरून ५० च्या आसपास पोहोचला. हे यश आहे. यश हे यश आहे. काँग्रेसने झोकून देऊन काम करायला हवे. निकालाची पर्वा न करता. निर्णयाची पर्वा न करता. ते लोकांना जेव्हा दिसेल. तेव्हा लोक तुमच्या पाठिशी उभे राहतील,” असा सल्ला रावतांनी काँग्रेस नेत्यांना दिला.
“राहुल गांधी यांच्या बाबतीत अशी विधान वारंवार होत असतात. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाचा मी सगळ्यात मोठा समर्थक आहे. सगळ्यांनाच पंडित नेहरू होता येत नाही. सगळ्यांनाच नरेंद्र मोदी होता येणार नाही. सगळ्यांना शरद पवार होता येणार नाही. प्रत्येकाच्या नेतृत्वाच्या आपल्या मर्यादा असतात. मोदींच्याही आहेत. अशा वेळेला ज्या सातत्याविषयी शरद पवार बोलत आहेत. मला असे वाटते की, शरद पवारांची जी भूमिका आहे, शरद पवारांचं सांगणं, हे त्यांच्यापेक्षा अनुभवानं कमी असलेल्या कुणीही फक्त राहुल गांधीच नाही, तर कुणीही मार्गदर्शन म्हणून स्वीकारायला हवं. ते जेव्हा बोलतात, तेव्हा त्यांचा एक अभ्यास असतो.”
“आम्हीसुद्धा अनेकदा पवारांचं मार्गदर्शन घेतो. मुख्यमंत्री घेतात. ते सुद्धा शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत. दांडगा अनुभव शरद पवारांचा असेल, तर सगळ्यांनी आपला अहंकार आणि इगो विसरून आपल्यापेक्षा ज्येष्ठ नेता आपल्याला काही सांगत असेल, तर आपण त्या भूमिकेत शिरायला पाहिजे. सातत्याने काही लोक असं बोलत असतील, काँग्रेसने चिंतन केले पाहिजे. मी त्यांच्या पक्षाविषयी बोलू शकतो. पण मला असे वाटतं की, काँग्रेसला राहुल गांधींशिवाय पर्यायच नाही.
राहुल गांधींच्या नेतृत्वाला तडे जावेत. त्यांचे प्रतिमाभंजन व्हावे, यासाठी भाजपाकडून कसोशीने प्रयत्न केले जातात. त्यांचं नेतृत्व उभंच राहू नये. राहुल गांधी कुठेही मेहनतीत कमी पडत नाहीत. त्यांना नशीब आणि भाग्य साथ देत नाही,” असे म्हणत राऊत यांनी काँग्रेसला चिंतन करण्याचा सल्ला दिला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App