शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला देशातील सर्वात उंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरुढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे.
सुरूवातीला अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडले.
विशेष प्रतिनिधी
संभाजीनगर : येथे क्रांती चौकात बसविण्यात आलेल्या देशातील सर्वात उंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वात मोठा 21 फुट उंच अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण रात्री उशिरा करण्यात आले. हा पुतळा देशातील सर्व उंच पुतळा असून त्याची उंची 52 फूट आहे. या पुतळ्याचे अनावरण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार होते माञ तसे झाले नाही . आदित्य ठाकरेंच्या हस्ते हा सोहळा पार पडला .SAMBHAJINAGAR: Witness historical moments! Grand Divine Welcome of Chhatrapati Shivaji Maharaj … Shivsagar-Saffron Storm-Dhol-Nagade-Only Jallosh; Chief Minister but Absent !.
शहरातील क्रांती चौक येथे नव्याने उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे (Shivaji Maharaj Statue) अनावरण झाले. देशातील सर्वात उंच असा हा शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आहे. त्यामुळे मराठवाड्याची राजधानी आणि पर्यटन नगरी संभाजीनगर (Aurangabad City) शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून क्रांती चौकातील या नव्या पुतळ्याची प्रतिष्ठापना व्हावी, यासाठी शिवप्रेमींची प्रतीक्षा सुरु होती. जानेवारी महिन्यात औरंगाबाद शहरात हा पुतळा दाखल झाल्यानंतर कधी एकदा महाराजांच्या दिमाखदार पुतळ्याचं दर्शन होईल, याची वाट प्रत्येक औरंगाबादकर पहात होता.
शिवरायांच्या पुतळ्याची वैशिष्ट्ये काय?
औरंगाबादेत दिमाखात उभ्या असलेला शिवरायांच्या पुतळा हा देशातील सर्वोच्च अश्वारुढ पुतळा आहे.
– पुतळ्याची चौथऱ्यासहित उंची 52 फूट आहे.
– फक्त पुतळ्याची उंची 21 फूट आहे.
– शिवरायांच्या पुतळ्याचे वजन 07 मेट्रिक टन एवढे आहे.
– शिवरायांचे हे शिल्प घडवण्यासाठी 98 लाख रुपये खर्च करण्यात आला.
– चौथऱ्याच्या सुशोभिकरणासाठी 2.55 कोटी रुपये खर्च झाला.
– अशा प्रकारे शिवरायांचा पुतळा आणि चौथऱ्याचे सुशोभिकरणासाठी अंदाजे 3.53 कोटी रुपये खर्च झाले आहेत.
– पुतळ्याभोवती वापरलेला धातू ब्राँझ आहे.
– चौथऱ्याचे सुशोभिकरण करताना प्रतापगडावरून प्रेरणा घेण्यात आली आहे. चौथऱ्याभोवतीच्या कमानीत 24 मावळ्यांच्या मूर्ती आहेत. तसेच हत्तींच्या सोंडेतून पाण्याचे कारंजे सोडण्यात आले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App