
वृत्तसंस्था
मथुरा – नंदलालाच्या ब्रज भूमीत मद्य आणि मांस विक्रीला बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने घेतला आहे. मद्य आणि मांस विक्रीच्या व्यवसायात असलेल्यांना वाऱ्यावर सोडून न देता त्यांना इतर व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन आणि मदत केली जाईल, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केले आहे. Saints & public representatives are of the view that liquor & meat shouldn’t be consumed in Mathura
भगवान श्रीकृष्णाशी संबंधित तीर्थस्थळे मथुरा, वृन्दावन, गोवर्धन, नन्दगांव, बरसाना, गोकुल, महावन आणि बलदेव या गावांमध्ये आणि शहरांमध्ये मद्य – मांसाच्या विक्रीला परवानगी नसेल. स्थानिक प्रशासन आणि ब्रज भूमी तीर्थक्षेत्र समिती एक विशेष योजना तयार करून मद्य – मांस विक्रीच्या व्यवसायात असणाऱ्या नागरिकांसाठी स्वतंत्र वेगळ्या व्यवसाय करण्याची व्यवस्था करेल.
The people engaged in such activities (sale of liquor & meat) may set up small stalls to sell milk in order to revive the glory of Mathura, that was known for producing huge quantity of milk: CM Yogi Adityanath in Mathura (30.08)
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) August 31, 2021
त्यांना पर्यायी व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देऊन आर्थिक मदतही करेल. त्या दोन्ही व्यवसायांमध्ये असणाऱ्यांची रोजी रोटी काढून घेण्याचा सरकारचा कोणताही इरादा नाही. त्यांना नवीन व्यवसायांसाठी प्रशिक्षण देखील देण्यात येईल, असे योगी आदित्यनाथ यांनी जन्माष्टमीच्या कार्यक्रमात सांगितले.
नंदलालाच्या ब्रज भूमीतील रहिवाशांची, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची आणि पर्यटकांची ही बऱ्याच दिवसांची मागणी होती, की ब्रज भूमीत मद्य – मांसाच्या विक्रीस बंदी असावी, ती मागणी आपले सरकार पूर्ण करीत आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले.
Saints & public representatives are of the view that liquor & meat shouldn’t be consumed in Mathura
Array