Russia Ukraine War : ‘टायटॅनिक’ अभिनेता लिओनार्डोची युक्रेनला मदत ; या देशाशी आहे खास नातं…

युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. मात्र रशियासारख्या प्रचंड देशासमोर युक्रेन पूर्णपणे कोलमडले आहे. अनेक सेलिब्रिटी युक्रेनच्या समर्थनार्थ आवाज उठवत आहेत.

 


प्रसिद्ध अभिनेता लिओनार्डो डि कॅप्रियो युक्रेनच्या मदतीसाठी धावून आला आहे. त्याने युक्रेनला जवळपास ७७ कोटी रुपयांची मदत केली आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : टायटॅनिकचा अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रियो युक्रेनच्या मदतीसाठी पुढे आला आहे.लिओनार्डो डीकॅप्रिओने दहा दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार अंदाजे ७६ कोटी रुपये युक्रेनला दान केले आहेत. त्याने ही रक्कम युक्रेनच्या लष्कर विभागासाठी आणि युक्रेनियन नागरिकांसाठी ही मदत केली आहे. विशेष म्हणजे लिओनार्डोची आजी युक्रेनमधील ओडेसा येथील होती. त्यामुळे या अभिनेत्याचे युक्रेनशी अधिक घट्ट नाते आहे.Russia Ukraine War: ‘Titanic’ actor Leonardo aids Ukraine; special relationship with this country …

https://twitter.com/visegrad24/status/1500489315759144962?s=20&t=YC1RuecJZfq6EfdKBK_SAQ

लिओनार्डो डी कॅप्रियोच्या या मदतीनंतर चाहते सोशल मीडियावर त्याचे खूप कौतुक करत आहेत. लिओनार्डोने यासोबतच इतर स्टार्सनाही मदतीसाठी पुढे येण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे अमेरिकन गायिका गिगी हदीद हिनेही युक्रेनसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. तिने याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली आहे. ती म्हणाली की, ‘ फॅशन वीकमध्ये ती जे काही कमावत आहे, ती निधी युक्रेनमधील पीडित लोकांना दान करणार आहे.

टायटॅनिक या चित्रपटातील लोकप्रिय अभिनेता लिओनार्डो डि कॅप्रियो याने युक्रेनला तब्बल १० मिलियन यूएस डॉलर्सची मदत केली आहे. त्याने केलेली ही मदत युक्रेनसाठी मोठा आर्थिक आधार ठरणार आहे.

दरम्यान, लिओनार्डो डि कॅप्रियो याचे युक्रेनसोबत एक वेगळे नाते आहेत. या नात्यामुळेच तो युक्रेनच्या मदतीला धावून आला आहे. लिओनार्डो डि कॅप्रियोची आजी युक्रेन देशातील ओडेसा भागात राहणारी होती. म्हणूनच त्याचे या देशासोबत जवळचे नाते आहे.

चालनानुसार त्याने युक्रेनला जवळपास ७६ कोटी ८८ लाख ९५ हजार रुपये मदत म्हणून दिले आहे. लिओनार्डो डी कॅप्रियोच्या या कृतीमुळे त्याचे चाहते त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. याशिवाय, ते इतर कलाकारांनाही अशी मदत करण्याचे आवाहन करत आहेत.

 

Russia Ukraine War: ‘Titanic’ actor Leonardo aids Ukraine; special relationship with this country …

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात