विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली :युक्रेन रशिया युद्धातून एक मोठी बातमी समोर आली आहे. युक्रेनमध्ये गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू ( Indian Student Death in Ukraine ) झाला आहे.अशी माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry of Foreign Affairs) दिली आहे. Russia Ukrain War: Tragic news – Indian student killed in shooting in Ukraine!
With profound sorrow we confirm that an Indian student lost his life in shelling in Kharkiv this morning. The Ministry is in touch with his family. We convey our deepest condolences to the family. — Randhir Jaiswal (@MEAIndia) March 1, 2022
With profound sorrow we confirm that an Indian student lost his life in shelling in Kharkiv this morning. The Ministry is in touch with his family.
We convey our deepest condolences to the family.
— Randhir Jaiswal (@MEAIndia) March 1, 2022
अनेक भारतीय अजून युद्धात युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना परत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनेकजण युक्रेन सोडून आजुबाजुच्या देशात जाण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र काही ठिकाणी त्यांची अडवणूक होत आहे. युक्रेनमध्ये रशिया आणि युक्रेनियन सैन्याकडून सतत गोळीबार, बॉम्बहल्ले, मिसाईल हल्ले होत आहेत.
यात आतापर्यंत अनेक युक्रेनियन नागरिक मारले गेले आहेत. यात अनेक युक्रेनच्या सैनिकांचाही मृत्यू झाला आहे.
सांगायला अत्यंत दु:ख होतं आहे की, आज सकाळी खारकीव येथील गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. परराष्ट्र मंत्रालय त्याच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहे. आम्ही त्याच्या कुटुंबाप्रती तीव्र संवेदना व्यक्त करतो, असं ट्विट परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी केलं आहे.
विद्यार्थी मूळचा कर्नाटकचा
खरकिव मध्ये एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. रशियन सैनिकांनी केलेल्या गोळीबारात हा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृत्यू झालेला शेखरप्पा ग्यानगौडा नवीन हा एमबीबीएसच्या चौथ्या वर्षाचा विद्यार्थी होता. नवीन हा मूळचा चलागेरी, कर्नाटक राज्यातील विद्यार्थी आहे. त्या
मृत्युने भारताला मोठा धक्का बसला आहे. रशिया युक्रेनच्या युद्धाची झळ साऱ्या जगाला बसत आहे. यात अनेक देशातील लोक अडकले आहेत. अमेरिकेने ठणकावूणही रशिया सर्व विरोध झुगारून युक्रेनवर रोज जोरदार हल्ले चढवत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App