प्रतिनिधी
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता ओसरली की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वतःहून मोदींना दूर सारेल, असा दावा प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी केला आहे. या वेळी त्यांनी मोदींच्या घसरत्या लोकप्रियतेचा आलेख पत्रकारांपुढे मांडला. RSS will sideline PM modi as soon as his popularity wades, claims congress leader anant gadgil
गाडगीळ म्हणाले, की संघाचे ‘मोतीबाग’ हे पुण्यातील कार्यालय माझ्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर असल्यामुळे संघाच्या कार्यपद्धतीचा जवळून अभ्यास करायला मिळतो. संघटनेपेक्षा कुठल्याही आपल्या व्यक्तीला एका मर्यादित लोकप्रियतेपेक्षा संघ मोठे होऊ देत नाही. तसेच, ‘गरज सरो वैद्य मरो’ या तत्त्वानुसार प्रभुत्व गमवणाऱ्या व्यक्तीला संघ अलगदपणे बाजूला सारतो, असा टोमणाही गाडगीळ यांनी लगावला आहे.
कोरोना लाट रोखल्याचा दावा मोदी सरकारने केला. पण तो खोटा असल्याचे आकडेवारीनिशी सिध्द होते आहे, असा दावा करून गाडगीळ म्हणाले की, भाजपची राजवट असणाऱ्या उत्तर प्रदेशातील शेकडो मृतदेहांच्या सामुदायिक दहनाचे परदेशी वृतपत्रांनी प्रसिद्ध केलेले फोटो, गंगेतून वाहणाऱ्या मृतदेहांचे व्हायरल व्हिडीओ, यामुळे पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेस तडा गेला आहे. संघाला अखेरीस दिल्लीत चिंतन बैठक बोलवावी लागली. दुसरीकडे अचानकपणे नितीन गडकरी यांच्या विविध भाषणांचे आणि कार्याचे व्हिडीओ व्हायरल होऊ लागणे याला बराच अर्थ आहे. मोदींची लोकप्रियता अधिक घसरल्यास, ९० च्या दशकात प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या लालकृष्ण अडवाणींना जसे संघाने कालांतराने बाजूला केले तसेच काही महिन्यांत मोदीजींनाही बाजूला करेल, असा राजकीय अंदाज गाडगीळ यांनी व्यक्त केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App