विशेष प्रतिनिधी
मुंबई: अभिनेता राम चरण (Ram Charan) आणि ज्युनियर एनटीआर (N. T. Rama Rao Jr.) स्टारर चित्रपट ‘रौद्रम रणम रुधिराम’ (RRR) चा दमदार टीझर (Teaser) रिलीज झाला आहे. हा 2022 चा सर्वात मोठा चित्रपट म्हटले जात आहे.RRR Teaser Out
टीझरमध्ये अॅक्शन आणि इमोशनची जबरदस्त झलक दिसतेय. रिलीज होताच टीझरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अजय देवगण (Ajay Devgn) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt)हे पहिल्यांदाच एका साऊथ चित्रपटात दिसणार आहे.
बाहुबली सीरीजमधून दिग्दर्शनाच्या कौशल्याने संपूर्ण जगाला चकित कराणारे एस.एस.राजामौली यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. यातील प्रत्येक दृश्य पाहण्यासारखे आहे. ‘RRR’ पुढील वर्षी मकर संक्रांतीला प्रदर्शित होणार आहे. आलिया भट्ट, अजय देवगण, ऑलिव्हिया मॉरिस, समुथिरकानी, रे स्टीव्हनसन आणि अॅलिसन डूडी यांसारखे अनेक स्टार्स या चित्रपटाचा भाग आहेत. ‘RRR’ ही तेलुगू भाषेतील पीरियड अॅक्शन ड्रामा फिल्म आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more