विशेष प्रतिनिधी
मुंबई : इंडियन प्रीमीयर लीग २०२१ च्या सातव्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने ३ विकेट्सने विजय मिळवला आहे. दिल्लीने राजस्थानला १४८ धावांचे आव्हान दिले होते. राजस्थानने हे आव्हान २ चेंडू बाकी ठेवत ७ विकेट्सच्या मोबदल्यात यशस्वी पूर्ण केले. राजस्थानच्या या विजयात डेव्हिड मिलर आणि ख्रिस मॉरिसने मोलाचा वाटा उचलला.
राजस्थान रॉयल्सच्या अष्टपैलू ख्रिस मॉरिसनं १८ चेंडूत नाबाद ३६ धावांची खेळी साकारून संघाला विजय प्राप्त करुन दिला.
यात ४ खणखणीत षटकारांचा समावेश आहे. मॉरिसनं या मॅच विनिंग खेळीसह आयपीएलच्या इतिहासातील त्याच्यावर लागलेली सर्वात मोठी बोली सिद्ध करुन दाखवली आहे. ख्रिस मॉरिसला यंदा लिलावात १६.२५ कोटी रुपयांना खरेदी करण्यात आलं आहे. RR vs DC IPL 2021 : Royals by three wicket win over Capitals
The @rajasthanroyals camp is elated as they pocket their first win in #IPL2021 after yet another thrilling finish.https://t.co/8aM0TZxgVq #RRvDC #VIVOIPL pic.twitter.com/J1XA8ggmZs — IndianPremierLeague (@IPL) April 15, 2021
The @rajasthanroyals camp is elated as they pocket their first win in #IPL2021 after yet another thrilling finish.https://t.co/8aM0TZxgVq #RRvDC #VIVOIPL pic.twitter.com/J1XA8ggmZs
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2021
दिल्लीच्या १४८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली होती. जोस बटलर, मनन वोहरा, कर्णधार संजू सॅमसन आणि शिवम दुबे स्वस्तात बाद झाले होते.
अवघ्या ३६ धावांमध्ये राजस्थानने चार विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर रियान पराग देखील अवघ्या दोन धावा करुन माघारी परतला होता. बेन स्टोक्सच्या जागी संघात संधी मिळालेल्या डेव्हिड मिलरनं संघाच्या धावसंख्येला सावरत ६२ धावांचं योगदान दिलं.
मिलर बाद झाल्यानंतर राहुल तेवतिया (१९) आणि अखेरीस ख्रिस मॉरिसनं सामन्यावरचा संपूर्ण दबाव नाहीसा करत संघाला विजय प्राप्त करुन दिला.
सॅमसनचा अफलातून झेल
राजस्थानचा यष्टीरक्षक कर्णधार संजू सॅमसन याने शिखर धवनचा अत्यंत अफलातून झेल घेतला. जयदेव उनाडकट याच्या गोलंदाजीवर उडालेली झेल सॅमसनने उजवीकडे सूर मारत पकडला. हा झेल कसा घेतला गेला असा प्रश्न खुद्द धवनलाही पडला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App