टिळकांच्या कार्यक्रमात सावरकरांचा विषय काढून घसरले, “राहुल बुद्धीचे” पवारांचे नातू आपल्याच आजोबांचा इतिहास विसरले!!, असे म्हणायची वेळ शरदनिष्ठ राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांच्या आजच्या वक्तव्यातून आली आहे. कारण रोहित पवारांनी आपल्या आजोबांचे समर्थन करताना जे वक्तव्य केले, त्यातून अजब तर्कट समोर आले आणि मूळ युक्तिवादही लंगडा पडला आहे.Rohit pawar raked up the issue of savarkar like rahul gandhi, will sharad pawar punch rohit on the issue??
उद्या 1 ऑगस्ट 2023 रोजी लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समावेत व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत मोदींना लोकमान्य टिळक सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. टिळक पुरस्काराच्या मुद्द्यावर काँग्रेस, शरदनिष्ठ राष्ट्रवादी, ठाकरे गट यांनी राजकारण उकरून काढत पवारांना टार्गेट केले आहे.
सध्याच्या राजकीय परिस्थितीत शरद पवारांनी मोदींबरोबर व्यासपीठ शेअर करू नये. त्यांच्याबरोबर व्यासपीठावर बसू नये, असा आग्रह संजय राऊत, वर्षा गायकवाड, वंदना चव्हाण यांच्यासह अनेक पुरोगाम्यांनी धरला आहे. त्यासाठी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीतल्या स्थानिक नेत्यांचे शिष्टमंडळ पवारांना भेटायला “1 मोदी बाग” या निवासस्थानी जाणारही होते. पण पवारांनी त्यांना भेटायलाच नकार देऊन टाकला. त्यामुळे महाराष्ट्रातल्या पुरोगाम्यांमध्ये राजकीय भूकंप झाला.
आजोबांचे समर्थन
या पार्श्वभूमीवर आपल्या आजोबांच्या समर्थनासाठी राष्ट्रवादीत सध्या “संजय राऊतांची” भूमिका बजावणारे रोहित पवार पुढे आले. त्यांनी पवारांच्या टिळक पुरस्कार कार्यक्रमातल्या उपस्थितीचे समर्थन केले. टिळक पुरस्काराचा कार्यक्रम पूर्णपणे वेगळा आहे, असे सांगताना रोहित पवारांनी औचित्य भंग करत सावरकरांचा विषय पुढे आणला.
टिळक पुरस्काराचा कार्यक्रम पूर्ण वेगळा आहे, त्यामुळे पवार साहेब त्याला उपस्थित राहणार आहेत. तिथे जर सावरकरांचा किंवा संघाचा कार्यक्रम असता, तर पवार साहेबांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये, अशी विनंती आपण त्यांना केली असती, असे वक्तव्य रोहित पवारांनी केले आहे.
पण हे वक्तव्यच मूळात वादग्रस्त आहे, हे रोहित पवारांनी लक्षात घेतलेले नाही. किंबहुना हे वक्तव्य करताना रोहित पवार आपल्याच आजोबांचा जुना आणि नवा राजकीय इतिहास देखील विसरले आहेत. या बाबतीत रोहित पवार हे थेट “राहुल बुद्धीचे नेते” बनले आहेत.
सावरकर स्मारकातील पवारांचे भाषण
एक तर रोहित पवारांनी ज्या अर्थाने सावरकरांच्या कार्यक्रमाला पवारांनी जाऊ नये, असे म्हटले आहे, तो अर्थच मूळात लोकमान्य टिळक पुरस्काराच्या कार्यक्रमाला गैरलागू आहे. शिवाय रोहित पवारांच्या वक्तव्यातून ज्या प्रकारचा सावरकर विरोध ध्वनीत होतो, त्या अर्थाने शरद पवारांनी कधीच सावरकरांचा विरोध केलेला आढळत नाही. पवार मुख्यमंत्री असतानाचे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातले भाषण युट्युब वर उपलब्ध आहे. त्यात त्यांनी सावरकरांना आद्य स्वातंत्र्यवीर अशा गौरवपूर्ण शब्दांमध्ये संबोधले आहे. इतकेच नाही, तर सावरकरांवर शरद पवार कधीच “राहुल बुद्धीने” टीका करत नाहीत. सावरकरांच्या सामाजिक योगदानाचा, त्यांच्या गाई विषयक तत्त्वज्ञानाचा पवार नेहमी पुरस्कार करत आले आहेत. पवारांचा सावरकरांच्या हिंदुत्वाला विरोध आहे. तो त्यांनी नोंदवलाही आहे.
राहुल गांधींना पवारांनी सुनावले होते
इतकेच काय पण विरोधी “इंडिया” आघाडी अस्तित्वात येण्यापूर्वी नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी जेव्हा 20 विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली होती, त्यावेळी पवारांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना सावरकरांच्या योगदानाविषयी सविस्तर माहिती दिली होती. राहुल गांधींनी सावरकरांच्या माफीनाम्याचा विषय अनावश्यकपणे उगाळू नये. तो “बॅकफायर” होऊ शकतो, असा गंभीर इशारा पवारांनी त्या बैठकीत दिला होता. तशा बातम्या सर्व प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या.
पवारांचे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील भाषण खूप जुने आहे, पण दिल्लीतल्या विरोधकांच्या बैठकीतले सावरकरांच्या विषयीचे त्यांचे वक्तव्य तर ताजेच आहे. पण या दोन्ही बाबी रोहित पवार विसरून गेले आणि त्यांनी आज टिळक पुरस्काराच्या कार्यक्रमात बेमालूमपणे सावरकरांचा मुद्दा मिसळून वादग्रस्त वक्तव्य करून टाकले.
रोहित पवारांना सुनावणार का??
शरद पवारांनी सर्व विरोधी पक्षांच्या बैठकीत राहुल गांधींना सावरकरांचा विषय अनावश्यक उकरून काढू नका, असे सुनावले होते. आता रोहित पवारांनी सावरकरांचा मुद्दा तसाच उकरून काढला आहे, तेव्हा पवार आपल्याच नातवाला राहुल गांधींना सुनावल्याप्रमाणेच सुनावणार आहेत का??
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App