भ्रष्टाचार उघड होण्याच्या भीतीनेच योगी आदित्यनाथ यांच्यावर सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची टीका


भ्रष्टाचार उघड होईल या भीतीनेच सेवानिवृत्त १०४ आयएएस अधिकाऱ्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर लव्ह जिहाद कायद्यावरून टीका केली आहे. या अधिकाऱ्यांना आपल्या  कार्यकाळात चुकीच्या मार्गाने कमाविलेली संपत्ती गमाविण्याची भीती सातत्याने वाटत आहे. त्यामुळेच ते योगी आदित्यनाथांवर टीका कर आहेत, असा आरोप उत्तर प्रदेशचे मंत्री आर. पी. सिंह यांनी केला आहे.
Retired officials criticize Yogi Adityanath

वृत्तसंस्था

लखनऊ : भ्रष्टाचार उघड होईल या भीतीनेच सेवानिवृत्त १०४ आयएएस अधिकाऱ्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर लव्ह जिहाद कायद्यावरून टीका केली आहे. या अधिकाऱ्यांना आपल्या कार्यकाळात अवैध मार्गाने कमाविलेली संपत्ती गमाविण्याची भीती सातत्याने वाटत आहे. त्यामुळेच ते योगी आदित्यनाथांवर टीका करत आहेत, असा आरोप उत्तर प्रदेशचे मंत्री आर. पी. सिंह यांनी केला आहे.
Retired officials criticize Yogi Adityanath

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना १०४ सेवानिवृत्त सनदी अधिकाऱ्यांना पत्र लिहून लव्ह जिहाद कायद्यासंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. राज्यातील पोलिसांना जनतेच्या हक्कांसंदर्भात तसंच लोकप्रतिनिधींनी पुन्हा एकदा राज्यघटनेचा अभ्यास करणं गरजेचं असल्याचं या पत्रात म्हटले आहे.

याबाबत आर. पी. सिंह म्हणाले, पत्र लिहिणाऱ्यांमधील काही अधिकाऱ्यांनी आपल्या सेवा काळात अवैध मार्गाने संपत्ती कमाविली आहे. योगी आदित्यनाथ यांनी भ्रष्टाचाराविरुध्द सुरू केलेल्या लढाईमुळे या अधिकाऱ्यांना सतत भीती वाटत असते. योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रीपदी राहिले तर त्यांच्या संपत्तीची चौकशी होईल या चिंतेत ते असतात.

Retired officials criticize Yogi Adityanath

पत्र लिहिणाऱ्यांमध्ये माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन, माजी परराष्ट्र सचिव निरुपमा राव, पंतप्रधानांचे माजी सल्लागार टी. के. नायर, के सुजाता राय आणि ए. एस. दौलत यांच्यासह उत्तर प्रदेशातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात