काही गोष्टी कालातीत असतात आणि त्या कधीच बदलत नसतात. उदाहरणादाखल पालकत्व या देणगीचा आपण विचार करू. मँडेलब्रॉट नावाच्या गणितज्ञाने असे म्हटले आहे की, एखाद्या गोष्टीचे पूर्वायुष्य हे त्याच्या भवितव्याची मर्यादा ठरवते. उदा. जे पुस्तक गेली 100 वाचले जात आहे ते यापुढेही कित्येक वर्षे वाचले जाईल. Recognize the central feeling of parenthood and build relationships
पण जे गेले वर्षभर वाचले जाते आहे, ते पुढील एक वर्षानंतर शिल्लक राहण्याची शक्यता फारच कमी आहे. शारिरीक संकल्पनांना हा नियम फारच चपखलपणे बसतो. पालकत्व ही या याच गटात बसणारी संकल्पना आहे. आयुष्याची जवळजवळ पहिली तीस वर्षे मुले पालकांवर विविध प्रकारे अवलंबून असतात.
मुलं जितकी लहान तितकं अवलंबित्व जास्त. उतारवयामध्ये या अबलंबित्वाची परतफेड होते. शेवटची तीस वर्षे पालक मुलांवर अवलंबून रहायला सुरुवात होते आणि त्यांचे प्रमाण वर्षागणिक वाढत जाते. मुलांची विविध प्रकारची सुरक्षितता ही पालकत्वातही सर्वात बोजड जबाबदारी आहे. यात गडबड झाल्यास पालक स्वतःला जन्मभर अपयशी समजतात.
आपली आयुष्याबद्दलची मते आणि अनुभव वापरून मुलांच्या आयुष्याला मदत आणि दिशा देण्याचा प्रयत्न करणे तसेच अवघड प्रसंगी सल्ला देणे हा पालक असण्याचा महत्वाचा भाग आहे. जे पालक अशाप्रकारे कठीण प्रसंगात उपयोगी पडतात ते मुलांच्या दृष्टीने आदरणीय होतात.
जन्मभर पुरणारी आणि पुढच्या सर्व नात्यांचा रंग आणि पोत ठरणारी ही शिदोरी पालक-मुलं या नात्यामध्ये जन्मते. कोणत्याही स्वनिर्मित कारणाशिवाय कोणीतरी माझ्यावर प्रेम करत आहे. माझ्यासाठी कष्ट घेत आहे, म्हणजे मी सुद्धा लायक व्यक्ती आहे, हा पाया भक्कम असणे गरजेचे आहे.
पालकत्वाची मध्यवर्ती भावना ही जबाबदारी आहे आणि ती सुसह्य व्हावी म्हणून म्हणून निसर्गाने आपुलकी प्रेम, कौतुक इत्यादी सहयोगी भावनाही निर्माण केल्या. सध्या दिसणारे आणि भविष्यात वाढत जाणारे बदल म्हणजे पालक आणि मुलांचा एकमेकांच्या सहवासात जाणारा वेळ कमी होतो आहे. मुलांच्या आयुष्यात अधिकाधिक लवकर इतर व्यक्ती प्रवेश करत आहेत आणि मुलांच्या आयुष्यावर अधिकार गाजवत आहेत. हे सर्वथा चुकीचे आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App