शेतकरी आंदोलनात विरोधकांचा फक्त विरोधासाठी विरोध, रविशंकर प्रसाद यांचा आरोप

शेतकरी आंदोलनात विरोधक फक्त विरोधासाठी विरोध करत आहेत. आम्ही शेतकऱ्याला स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि विरोधक आता दुटप्पी भूमिका घेत आहेत कारण मोदी सरकारवर टीका करायची आहे, असा आरोप केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनात विरोधक फक्त विरोधासाठी विरोध करत आहेत. आम्ही शेतकऱ्याला स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि विरोधक आता दुटप्पी भूमिका घेत आहेत कारण मोदी सरकारवर टीका करायची आहे, असा आरोप केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला आहे. Ravi Shankar Prasad farmer protest latest news

प्रसाद म्हणाले की, मोदी सरकारला शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करायचं आहे. त्यासाठी हे कायदे आणले गेले आहेत. बाजार समितीच्या कायद्यात सुधारणा करण्यात यावी यासाठी शरद पवारांनीही २०१० मध्ये पत्र लिहिलं होतं. आता सोयीस्करपणे सगळ्यांना त्या वेळचा विसर पडला आहे. शरद पवार हे जेव्हा देशाचे कृषी मंत्री होते तेव्हा याच मुद्द्यांवरुन त्यांनी देशाच्या सगळ्या राज्यातील मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होते. बाजार समित्यांच्या कायद्यात बदल करणं आवश्यक आहे असं त्यांनी या पत्रात लिहिलं होतं. शेतकऱ्यांना कधीही त्यांचा शेतमाल विकण्याचा हक्क असला पाहिजे असंही या पत्रात त्यांनी म्हटले होते.

Ravi Shankar Prasad farmer protest latest news

शेतकरी नेत्यांनी हे स्पष्टपणे सांगितलं आहे की आम्ही कोणत्याही राजकीय मंचावर जाणार नाही. आम्हाला शेतकऱ्यांच्या या भूमिकेचा आदर आहे. मात्र आता काँग्रेससह इतर विरोधकांनी या आंदोलनात उडी घेतली. कारण त्यांना फक्त नरेंद्र मोदींचा विरोध करायचा आहे असे सांगून रविशंकर प्रसाद म्हणाले, शेतकऱ्यांसाठी जे कायदे तयार करण्यात आले आहेत ते त्याबाबत काही शेतकरी संघटनांना शंका आहेत. त्यावर सरकारची शेतकऱ्यांशी चर्चा सुरु आहे. चर्चेच्या फेऱ्या सरकारकडून सुरु आहेत. मात्र अचानक फक्त विरोधाला विरोध दर्शवायचा म्हणून काँग्रेससह सगळे विरोधी पक्ष या आंदोलनात उतरले आहेत.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात