राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केल्यावर एकनाथ खडसे यांना काहीही काम नाही. मात्र, आपण काही तरी काम करतोय हे दाखविण्यासाठी ते भाजपावर आरोप करत आहेत, असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. rashtravadi congress latest news
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केल्यावर एकनाथ खडसे यांना काहीही काम नाही. मात्र, आपण काही तरी काम करतोय हे दाखविण्यासाठी ते भाजपावर आरोप करत आहेत, असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. rashtravadi congress latest news
भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेच्या नऊ राज्यात शाखा असून ११०० कोटींची मालमत्ता मातीमोल भावात विकली गेल्याचा दावा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केला होता.
त्यावर उत्तर देताना दरेकर म्हणाले की, जी गोष्ट चौकशीत आहे त्यावर निष्कर्ष येईल. मला खडसेंना विचारायचं आहे, राज्य सरकारी बँकेने कारखाने जे लिलावात काढले आहेत, ५०० कोटींचे कारखाने १० ते १५ कोटींना विकले. त्याची चौकशी करा.
बुलडाणा अर्बन बँक, वर्धा बँक, नागपूर बँक असेल अख्ख्या बँकाच्या बँका डुबवल्या आहेत. राज्य सरकारी बँकेने त्या ठिकाणी कर्ज दिलं आहे, जिथं केवळ जागा आहे प्रकल्प देखील नाही. अशा प्रकल्पांना कर्ज दिलं आहे. राज्यातील सर्व बँका, पतसंस्था कुठल्याही पक्षाच्या असू द्या ज्यांंचे ज्यांचे घोटाळे आहेत, त्यांची एकादाच काय ते सर्व चौकशी लावा आणि सत्य परिस्थिती जनतेसमोर येऊ द्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App