विशेष प्रतिनिधी
नागपूर : राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यास एनडीएच्या फायद्याचेच आहे. त्यांच्यामुळे एनडीएला चांगली संधी मिळते. सध्या काँग्रेसला अध्यक्षच सापडत नाही. त्यामुळे शरद पवारांना काँग्रेसचे अध्यक्ष करून आधी झालेल्या अन्यायाचे परिमार्जन करावे, असा न मागता सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसला दिला. त्याचबरोबर शरद पवार एनडीएमध्ये आल्यास मोदींचे हात आणखी बळकट होतील, असा दावाही त्यांनी केला. ramdas athwale pitches for sharad pawar
नागपुरात ते पत्रकारांशी बोलत होते. प्रफुल्ल पटेल यांनी लिहिलेल्या लेखाशी आठवले यांनी सहमती व्यक्त केली. ते म्हणाले, ‘पवारांना काँग्रेसने अपमानास्पद वागणूक दिली. त्यांना पंतप्रधान होण्याची संधी असतानाही डावलले. संसदीय बोर्डाच्या बैठकीतही त्यांच्याशी योग्यपध्दतीने वागत नव्हते. ramdas athwale pitches for sharad pawar
दस्तुरखुद्द सोनीया गांधी यांनीही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. पवार यांच्यावर काँग्रेसमध्ये असताना अन्याय झाला. आता हा अन्याय दूर करण्याची संधी काँग्रेसला आहे. त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष केल्यास काय हरकत आहे, असा टोला आठवले यांनी लगावला.
आठवले म्हणाले…
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App