अखेर रात्रीस खेळ झाला… राज्यसभा निवडणुकीच्या आदल्या दिवशी रात्री शरद पवारांनी राष्ट्रवादीचा मतांचा कोटा फिरवला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा प्रचंड संताप झाला. या संतापानं तर तो कोटा पुन्हा पूर्ववत केल्याच्या बातम्या आल्या… पण अखेरीस जो खेळ व्हायचा तो झालाच!! अपक्ष आमदारांच्या रूपाने तो खेळ नेमका कोणी केला हा महाराष्ट्राचा “संशोधनाचा” विषय ठरला आहे!!Rajya Sabha elections: 2 years ago, 2 NCP candidates were elected; This year, however, the second candidate of Shiv Sena is flat !!; Understand the chronology
2 वर्षांपूर्वी शिवसेनेने शब्द दिल्यानंतर आणि पाडल्यानंतर राष्ट्रवादीचे दोन उमेदवार शरद पवार आणि फौजिया खान बिनबोभाटपणे राज्यसभेत निवडून गेले होते.
2 वर्षानंतर संभाजीराजे राजकीय एपिसोड मधून शिवसेनेपुढे संघर्षाचे ताट वाढून ठेवण्यात आले. यावर विशेषत्वाने संशोधन झाले पाहिजे.
संशोधनात आत्तापर्यंत आलेले “अनुभव” नावाचे एक गृहितक असते. हे गृहीतक नेमके काय सांगते??, याकडे उघडून डोळे नीट पाहिले तर संजय पवार नावाच्या सामान्य शिवसैनिकाच्या पराभवाचे खरे राजकीय इंगित समजून येईल!!
संजय पवार या सामान्य शिवसैनिकाचा राज्यसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. पियुष गोयल, प्रफुल्ल पटेल, संजय राऊत, धनंजय महाडिक हे प्रस्थापित नेते आपापल्या राजकीय पक्षांमधून विजयी झाले आहेत.
भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज जरी धनंजय महाडिक यांच्या विजयाचा गुलाल उधळत असले, तरी हे धनंजय महाडिक शिवसेना, राष्ट्रवादी अशी राजकीय यात्रा करून भाजपमध्ये दाखल झाले आहेत हे विसरून चालणार नाही. 2014 च्या मोदी लाटेत कोल्हापुरातून ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर लोकसभेत पोहोचले होते, हा मुद्दा येथे अधोरेखित केला पाहिजे.
राज्यसभा निवडणुकीच्या आधी छत्रपती संभाजीराजे राजकिय एपिसोड नेमका कोणी घडविला?? याचा उघडून डोळे नीट विचार केला पाहिजे.
राष्ट्रवादी काँग्रेसची जादाची सर्व मते शिवसेनेच्या उमेदवाराला देणार हे शरद पवार यांनी जाहीर केले होते. संजय पवार या शिवसेनेच्या उमेदवाराला 33 मते मिळाली आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेसची जादा मते आहेत का?? असल्यास संजय पवार यांना अपक्षांनी मते का दिली नाहीत?? त्यांच्या मागची “प्रेरणाशक्ती” कोणती होती?? केवळ संजय राऊत शाब्दिक दृष्ट्या आमदारांना “घोडे” म्हणाले म्हणून अपक्ष आमदारांनी चिडून जाऊन आपल्या सदसद्विवेकबुद्धीला स्मरुन धनंजय महाडिक यांना मते दिली आहेत का?? याचा विचार केला पाहिजे.
आम्ही ज्याला मते दिली तो उमेदवार निवडून येणार असे बहुजन विकास आघाडीचे नेते आमदार हितेंद्र ठाकूर म्हणाले होते. हेच हितेंद्र ठाकूर हे मतदानापूर्वी प्रफुल्ल पटेल यांच्या बरोबर चर्चा करतानाचा फोटो प्रसिद्ध झाला आहे.
घोडेबाजार या शब्दावर तीव्र आक्षेप घेणारे चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या घरी जाऊन खासदार सुप्रिया सुळे त्यांना आणि त्यांच्या मातोश्रींना भेटल्या होत्या. राज्यसभा निवडणुकीचा मुहूर्त त्यांनी साधला होता. याकडे दुर्लक्ष करता येईल का??
या सर्व क्रोनोलॉजी नीट समजून घेतल्या की कदाचित धनंजय महाडिक यांच्या विषयाचे उत्तर मिळेल!!
बाकी मराठी प्रसारमाध्यमांनी हा विजय देवेंद्र फडणवीस यांच्या स्ट्रॅटेजीचा आहे, असे म्हटलेच आहे. आता मराठी माध्यमांच्या काँग्रेसी बुद्धीच्या विश्लेषणाचे काय बोलावे?? फडणवीस यांच्या 2019 च्या निर्णायक क्षणाच्या वेळेच्या मुत्सद्देगिरीविषयी देखील काय बोलावे??
महाविकास आघाडी सरकार येऊन अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारची वाटचाल तीन वर्षांकडे निघाली आहे. नेमका हाच राजकीय मुहूर्त साधून महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री या टायटल खाली सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा घडविण्यात येत आहे. हे सहज घडते आहे का?? कोणतेही सरकार स्थिर ठेवायचे नाही ही राजकीय सवय नेमकी कोणाची आहे?? सरकार स्थिर झाले की आपले आसन डळमळीत झाले अशी भीती कायम कोणाला वाटते?? या प्रश्नांची उत्तरे देखील शोधली पाहिजेत.
राज्यसभा निवडणुकीच्या निकाला आधी काही मिनिटे प्रफुल्ल पटेल यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. अशा पुसट बातम्या प्रसार माध्यमांमध्ये आल्या आहेत. या भेटीत राज्यसभेच्या निवडणुकीचा भूतकाळ म्हणजे मतदान कसे केले वगैरे चर्चिला गेला?? की राज्यसभा निवडणुकीनंतरचा भविष्यकाळ चर्चेला आला होता हे त्या दोघांखेरीज “तिसऱ्या कोणाला” माहिती असणार??
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App