आमदारकीसाठी काय पण, हे माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दाखवून दिले आहे. सहा महिन्यांपूर्वी कृषी कायद्याच्या अध्यादेशाला पाठिंबा देणाऱ्या राजू शेट्टी यांनी आता मात्र हे कायदेच रद्द करण्याची मागणी केली आहे. शरद पवारांनी आमदारकीची लालूच दाखविल्यानेच शेट्टी यांची भूमिका बदलल्याची टीका होत आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे : आमदारकीसाठी काय पण, हे माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दाखवून दिले आहे. सहा महिन्यांपूर्वी कृषि कायद्याच्या अध्यादेशाला पाठिंबा देणाऱ्या राजू शेट्टी यांनी आता मात्र हे कायदेच रद्द करण्याची मागणी केली आहे. शरद पवारांनी आमदारकीची लालूच दाखविल्यानेच शेट्टी यांची भूमिका बदलल्याची टीका होत आहे. Raju Shetty sadabhau khot latest news
केंद्र सरकारने जूनमध्ये कृषी कायद्यासंदर्भात तीन अध्यादेश काढले होते. तेव्हा त्याला राजू शेट्टी यांनी तत्त्वत: पाठिंबा दिला होता. शेट्टी यांचा या अध्यादेशाला सरसकट पाठिंबा नव्हता. त्यातील काही मुद्द्यांना त्यांनी पाठिंबा दिला होता. परंतु, याच अध्यादेशाचं रुपांतर कायद्यात झाल्यानंतर शेट्टी यांनी हा संपूर्ण कायदाच रद्द करण्याची मागणी केली आहे. व्यक्तिगत राजकीय फायद्यासाठी त्यांनी हा विरोध केल्याचे बोलले जात आहे.
राजू शेट्टी यांनी म्हटले होते की, अध्यादेशातून शेतमाल जीवनावश्यक वस्तूच्या यादीतून वगळण्यात आला होता. त्याला मी स्वत: पाठिंबा दिला होता. बाजार समितीच्या बाहेर शेतीमाल विकता येईल, असं अध्यादेशात नमूद करण्यात आलं होतं. त्यावरही आमचं काही म्हणणं नव्हतं. आमचा आक्षेप केवळ कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आणि हमी भाव अनिवार्य करण्याला होता, असं शेट्टी यांनी म्हटले होते.
राजू शेट्टी यांच्या या विसंगत भूमिकेवर रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी जोरदार टीका केली आहे. राजू शेट्टी आता शेतकऱ्यांचे नेते राहिले नाहीत. भांडवलदार, व्यापारी आणि दलालांशी त्यांची नाळ जुळली आहे, अशी टीका करतानाच शेट्टी हे शरद जोशींच्या शाळेतील विद्यार्थी होते, पण ते जोशींच्या परीक्षेत नापास झाले आहेत. त्यांना शेतकऱ्यांचे नेते व्हायचे असेल तर पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत दिल्यामुळे राजू शेट्टी ठाकरे – पवार सरकारवर नाराज
केंद्र सरकारने कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यापारी, दलालांची मक्तेदारी मोडून काढली. काही नेत्यांनी शेतकऱ्यांच्या जिवावर बाजार समित्यांचा राजकीय अड्डा तयार केला होता. तो उद्ध्वस्त करण्याचे काम केंद्र सरकारने केले. तसेच शेतकऱ्यांना हमीभाव देऊन त्यांच्या प्रगतीचा मार्ग मोकळा केला आहे. मात्र, या विधेयकाला विरोध करून शेट्टी हे लुटारुंच्या टोळीचे नेतृत्व करत आहेत, असा टोलाही खोत यांनी लगावला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App