मुलांना चांगल्या प्रकारे वाढवा


मुलं थोडी मोठी झाली की स्वतःला समूहाशी, समाजाशी जोडून घ्यायला लागतात. ती शाळेत जाऊ लागेपर्यंत त्यांचं जग कुटुंबापुरतं मर्यादित असतं. शालेय वयात शिक्षक व शाळेतल्या मुलांबरोबर बऱ्या – वाईट सवयींची देवाणघेवाण होत असते. अनुकरणातून भाषा व वागणं दोन्हींत फरक पडत असतो.  Raise children well

शालेय वयात स्वतःचं महत्त्व वाढावं अशी आंतरिक इच्छा असते. तशीच इतरांना मदत करावी, अशीही बुद्धी असते. इतरांबरोबर स्पर्धा करावीशी वाटते, पण मैत्रीही हवी असते. मैत्रीसाठी इतरांना खूष ठेवण्याचीही तयारी असते.

इतरांची मतं वेगळी असण्याची जाणीव व वेगळी मतं समजून घेण्याची वृत्ती या वयात वाढीला लागत असते. सामाजिक घटनांमध्ये रस घेण्याचं हे वय असतं. इतरांबद्दल, जगाबद्दल जाणून घेण्याची चिकित्सक वृत्ती असते. चांगले शिक्षक मुलांच्या या जाणिवांचा, क्षमतांचा सकारात्मक उपयोग करून घेऊ शकतात. मुलांचं निरोगी व्यक्तिमत्त्व घडवू शकतात.

महत्त्वाचा मुद्दा हा, की या वयात आईवडिलांपेक्षा मुलांच्या लेखी शिक्षकांचं महत्त्व जास्त असू शकतं. शालेय जीवनातच मुलांनी काही वेळा आपल्या गरजा पुढं ढकलायला शिकायला हवं. आपली वस्तू इतरांना द्यायला शिकायला हवं. पाळीपाळीनं आपल्याला गोष्टी मिळतील, ही जाणीव शिकायला हवी. यासाठी शिक्षकांची वर्तणूक सर्व मुलांशी सारखी हवी.

काही विशिष्ट मुलांना महत्त्व दिलं गेलं, तर त्यात त्या मुलांचं नुकसान होऊ शकतं, ही जाणीव शिक्षकांना हवी. तशीच पालकांनाही हवी. घरी लाडोबा असलेल्या मुलांचे आई-वडील आपल्या मुलाची कड घ्यायला वारंवार शाळेत जात असतील, तर ते गैर आहे. कारण चिकित्सक वृत्ती दाखवायची ती शाळा निवडताना. एकदा शाळेत घातलं, की शिक्षकांवर विश्वािस ठेवायला हवा.

मुलांमधील वादावादी कशी सोडवायची याचं स्वातंत्र्य शिक्षकांना द्यायला हवं. पालकांनी त्यात पडू नये. यातूनच मुलांचा सामाजिक विकास योग्य तऱ्हेनं घडण्याची शक्याता वाढते. मैत्री करणं, जमवून घेणं, सहकार्य करणं, मदत करणं, ही सामाजिक कौशल्य मुलं शाळेतच शिकू शकतात. ती शिकत असताना येणाऱ्या अडचणी मुलामुलींनी शाळेतल्या शाळेत, शिक्षकांच्या निगराणीखाली त्यांच्या मदतीनं सोडवायच्या असतात, याची पालकांना जाणीव हवी. यातूनच त्याचा मेंदू परिस्थीतीशी दोन हात करण्यास शिकतो.

Raise children well

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण