शेतीतील गुंतवणूक कशी वाढविणार, या प्रश्नाला उत्तर देता न आल्याने महिला पत्रकाराचा प्रश्नच राहुल गांधींनी भरकटवला…


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देतानाच काँग्रेसकडून दोन कोटी शेतकऱ्यांच्या सह्यांचे पत्र काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी राष्ट्रपतींना सोपविले. त्याची माहिती राष्ट्रपती भवनासमोरच उभे राहून पत्रकारांना दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोपांची सरबत्ती केली… पण त्याच वेळी एका महिला पत्रकाराने विचारलेल्या साध्या प्रश्नाला उत्तर देता न आल्याने तिचा प्रश्नच राहुल यांनी भरकटवून टाकला. rahul gandi deflects original question of agriculture investment by woman journalist

या महिला पत्रकाराने साधा प्रश्न विचारला होता, शेतीमध्ये गुंतवणूक वाढविण्यासाठी कृषी कायदे आणल्याचे सरकार सांगते आहे… पण ही गुंतवणूक कशी येणार… हे तुम्ही जनतेपर्यंत जाऊन का नाही सांगत… या प्रश्नाचा आशयच राहुल गांधींच्या लक्षात आला नाही.

त्यांनी त्या महिला पत्रकारालाच प्रतिप्रश्न विचारायला सुरवात केली. तुमचे वडील काय करतात… पत्रकार म्हणाली सैनिक आहेत… आई शेतकरी आहे… हा मुद्दा राहुल गांधींनी उचलून शेतीत शेतकरी गुंतवणूक करतो, मजूर गुंतवणूक करतो… तुम्ही आम्ही सगळे गुंतवणूक करतो… पण फायदा कोणाला मिळतो? मोदींच्या भोवती असणाऱ्या दोन – तीन बिझनेसमनलाच फायदा मिळतो ना… ही महिला राहुल गांधींना थांबवून विचारते…

पण शेतीतली व्यापक गुंतवणूक कशी येणार… राहुल गांधी परत त्या महिलेला तेच उत्तर देतात. लाखो शेतकरी, मजूर गुंतवणूक करताहेत… पण फायदा मोंदीभोवतीच्याच लोकांचा होतोय… हे तुम्ही समजावून घ्या… इथे जे लाखो शेतकरी आंदोलनाला बसलेत ते काय इथे मिठाई खायला आलेत का… ते दिवसातले २४ तास शेतीत गुंतवणूक करत असतात…

rahul gandi deflects original question of agriculture investment by woman journalist

ते तुम्हाला दिसत नाहीत का… त्यांचे म्हणणे तुम्हाला समजत नाही का…, असे राहुल गांधी त्या महिला पत्रकारालच सुनावत राहिले…. पण यात शेतीतील एकूण गुंतवणूक वाढविण्यासाठी कायदा केल्याचे सरकार सांगते आहे… ती गुंतवणूक कशी येणार… आणि कशी वाढविणार… या मूळ प्रश्नाला उत्तर न देतात राहुल गांधी तेथून निघून गेले.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात