राहुल गांधींचा घोटाळा, दुसऱ्या वरती विसंबला; कार्यभाग बुडाला!!, असे त्यांच्या बाबतीत अवघ्या काही दिवसांमध्ये दुसऱ्यांदा घडले.Rahul Gandhi’s extra intellectual dependency lead his failure
सावरकर अवमान प्रकरणात राहुल गांधींचे वकील मिलिंद पवार यांनी त्यांच्या जीवाला धोका असल्याचा अर्ज राहुल गांधींना किंवा त्यांच्या टीमला माहिती न देताच परस्पर पुण्याच्या कोर्टात सादर केला. त्यामुळे राहुल गांधींची पुरती गोची झाली. सगळीकडे बातम्या आल्यानंतर तो अर्ज मागे घेण्याची वेळ वकिलावर आली.
त्या पाठोपाठ ज्या CDSS लोकनीतीच्या सर्वेक्षणावर अवलंबून राहून राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर मतदान चोरीचे आरोप केले. त्याबद्दल मोठे कॅम्पेन चालविले. बिहार मध्ये मतदार अधिकार यात्रा काढली. पण त्या सगळ्याचे मुसळ एका झटक्यात केरात गेले. कारण लोकनीती CSDS प्रमुख संजय कुमार यांनी महाराष्ट्राच्या deta चुकीचा भरल्याबद्दल माफी मागून ते मोकळे झाले. त्यामुळे राहुल गांधी पुन्हा अडचणीत आले.
– सावरकर बदनामी केस मधला घोटाळा
सावरकर बदनामी प्रकरणात राहुल गांधींची केस लढविणारे वकील मिलिंद पवार यांनी दोन वेगवेगळ्या मुद्द्यांची परस्पर सरमिसळ केली. राहुल गांधींनी मतदान चोरीचा आरोप केल्यामुळे त्यांच्या जीवाला धोका असल्याचा अर्ज त्यांनी पुण्याच्या कोर्टात सादर केला. त्यासाठी राहुल गांधींची किंवा त्यांच्या टीमची परवानगी घ्यावी, असे सुद्धा मिलिंद पवारांना वाटले नाही. त्यांनी विनापरवानगी किंवा राहुल गांधींना माहिती न देताच तो अर्ज कोर्टात सादर केला. त्याच्या बातम्या सगळीकडे झळकल्या सावरकर बदनामीचा विषय divert करण्यासाठी राहुल गांधींनी डाव खेळण्याचे आरोप झाले. त्यात सात्यकी सावरकरांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा मुद्दा पुढे करून राहुल गांधींनी कायद्याच्या कचाट्यातून आपली मान सोडवण्याचा प्रयत्न केला, पण हे सगळेच राजकीय गणित बिघडले. कारण राहुल गांधी स्वतःच्या बुद्धीनुसार चालण्यापेक्षा दुसऱ्याच्या बुद्धीवर अवलंबून राहिले.
– मतदान चोरीचा deta वाचण्यात घोटाळा
मतदान चोरीच्या आरोपांच्या बाबतीतही नेमके तेच झाले. राहुल गांधींनी CSDS लोकनीतीच्या महाराष्ट्रातल्या deta वर विश्वास ठेवून अवलंबून राहिले. पण त्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी म्हणे deta वाचण्यात आणि मोजण्यात चूक केली. राहुल गांधींनी आणि त्यांच्या टीमने देखील तो deta नीट वाचला नाही. नीट समजून घेतला नाही. त्यामुळे त्यांची सगळी मतदान चोरीच्या आरोपांची मोहीम फाफलली.
– दुसऱ्या वरती अवलंबला
हे सगळे राहुल गांधींच्या दुसऱ्या वरती विसंबून राहिल्याने घडले. त्यांचा कार्यभाग बुडाला. इथं राहुल गांधी आपल्या आजीकडून काहीच शिकले नसल्याचे स्पष्ट झाले. इंदिरा गांधींना अनेक सल्लागार होते. वकील होते. सहाय्यक होते. पण त्यांच्यापैकी कुणावरही ज्यादा विश्वास ठेवून आणि अवलंबून राहून त्यांनी आयुष्यात कधीही राजकारण केले नाही. राजकीय मोहिमा चालविल्या नाहीत. इंदिरा गांधींनी जे काही राजकारण केले, ज्या काही राजकीय मोहिमा चालविल्या किंवा अगदी ज्या काही चुका केल्या, त्या स्वतःच्या बुद्धीने केल्या. इतरांच्या बुद्धीने नाही. राहुल गांधींचे त्यांच्या नेमके उलट घडल्याचे वर उल्लेख केलेल्या उदाहरणांवरून सिद्ध झाले.
-इंदिरा गांधींविरुद्ध “असं” करायची हिंमत झाली असती का??
*इंदिरा गांधींना न विचारता किंवा त्यांच्या टीमचा सल्ला न घेता कुठल्याही वकिलाचा कुठलाही अर्ज कुठल्याही कोर्टात सादर करायची हिंमत झाली नसती. आणि “तशी” “हिंमत” कुणी केली असती, तर इंदिरा गांधींनी तो वकील किंवा ती व्यक्ती त्या व्यवसायात शिल्लक ठेवली नसती. राहुल गांधींना मिलिंद पवार नावाचा वकील फसवू शकला, यात मिलिंद पवारचे फार मोठे बुद्धी कौशल्य मानायचे कारण नाही, किंवा त्यात भाजप वगैरेचा हात देखील शोधायचे कारण नाही. कारण या प्रकरणातून राहुल गांधींची दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची उणीव मात्र ठळकपणे समोर आली. तेच मतदान चोरीच्या बाबतीत लोकनीती CSDS सर्वेक्षणाच्या बाबतीतही घडून गेले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App