२०१९ च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल मे महिन्यांत लागल्यानंतर देशातील १७ राज्यांत राहुल गांधी फिरकलेही नसल्याचे उघड झाले आहे. यातही पाच राज्यांत त्यांनी केवळ एकदा भेट दिली तर पाच राज्यांत दोन वेळा त्यांचा दौरा झाला.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल मे महिन्यांत लागल्यानंतर देशातील १७ राज्यांत राहुल गांधी फिरकलेही नसल्याचे उघड झाले आहे. यातही पाच राज्यांत त्यांनी केवळ एकदा भेट दिली तर पाच राज्यांत दोन वेळा त्यांचा दौरा झाला. Rahul Gandhi latest news
राहुल गांधी गंभीरपणे राजकारण करत नाहीत असा आरोप त्यांच्याच पक्षाचे नेते करत आहेत. पक्षातील २३ नेत्यांनी याबाबत लेटरबॉंब टाकून आपली नाराजी व्यक्त केली होती. तरीही राहुल गांधी यांना पुन्हा कॉंग्रेसच्याच अध्यक्षपदावर बसविण्याची तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांची गेल्या दीड वर्षांतील कामगिरी समोर आली आहे.
लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. सोनिया गांधी यांच्याकडे हंगामी अध्यक्षपद देण्यात आले. तरीही पक्षावर नियंत्रण राहुल गांधी यांचेच राहिले. मात्र, या दीड वर्षांच्या काळात राहुल यांनी पक्षाला पूर्णपणे वाऱ्यावर सोडले. महाराष्ट्र, पंजाब, झारखंड, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यांचा त्यांनी केवळ एकदा दौरा केला. विशेष म्हणजे या पाचही राज्यांत कॉंग्रेस सत्तेत सहभागी आहे. हे दौरेही केवळ निवडणुकांच्या काळात करण्यात आले होते.
ऑक्टोबर २०१९ मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी फक्त एकदा ते आले होते. झारखंडमध्ये ते विधानसभा निवडणुकीच्या अगोदर एकदा गेले होते. छत्तीसगडमध्ये एका आदिवासी नृत्य महोत्सवाचे उद्घाटन करण्यासाठी राहुल गांधी गेले होते. राजस्थानमध्ये गेल्या काही महिन्यांत अनेक वेळा राजकीय पेचप्रसंग निर्माण झाले. पण राहुल तिकडे फिरकले नाहीत. फक्त एकदाच जानेवारी २०२० मध्ये कॉंग्रसेने केलेल्या युवा आक्रोश रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
महाराष्ट्रात नोव्हेंबरमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून कॉंग्रेस सत्तेत सहभागी झाली. परंतु, राहुल यांचा शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होण्यास विरोध होता. त्यामुळे महाराष्ट्रापासून दूर राहणेच त्यांनी पसंत केले आहे. महाराष्ट्रात पक्षातील अनेक नेत्यांचे आपसांत वाद असल्याने गटबाजी उफाळून आली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून कॉंग्रेसला किंमत दिली जात नसल्याने नेत्यांमध्ये असंतोष आहे. मात्र, त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी राहुल आले आहेत, असे झालेले नाही.
राहुल गेल्या काही दिवसांत एकदाच बाहेर पडले ते म्हणजे कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी पंजाबध्ये ट्रॅक्टर रॅलीमध्ये सहभागी झाले होते. याठिकाणी त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. वास्तविक हरियाणा राज्य दिल्लीच्या सीमेला लागून आहे. याठिकाणी कॉंग्रेसला चांगली संधीही होती. मात्र, हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी ऑक्टोबर २०१९ मध्ये राहुल यांचा दौरा झाला होता. त्यानंतर तब्बल एक वर्षांनंतर ते कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी रॅलीत सहभागी होण्यासाठी हरियाणात गेले.
डिसेंबर २०१९ मध्ये नागरिकत्व संशोधन कायद्याला विरोध करण्यासाठी राहुल यांनी आसामचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी सैम स्टैफर्ड यांच्या कुटुंबाची भेट घेतली होती. मात्र, पुन्हा या आंदोलनाचे काय झाले हे पाहण्याची तसदी त्यांनी घेतली नाही. त्यानंतर एक वषार्नंतर माजी मुख्यमंत्री तरुण गोगाई यांन श्रध्दांजली वाहण्यासाठी ते आसामला गेले. वास्तविक आसाममध्ये २०२१ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. कॉंग्रेसने २००१ पासून सतत तीन वेळा आसाममध्ये विजय मिळविला होता. २०१६ मध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाकडून पराभव झाला. परंतु, तरीही आसाममध्ये कार्यकर्त्यांना उत्साहित करण्यासाठी दौरा करावा असे राहूल गांधी वाटले नाही.
उत्तर प्रदेश हे देशातील महत्वाचे राज्य आहे. येथेही २०२१ मध्ये निवडणुक होणार आहेत. मात्र, राहुल गांधी दीड वर्षांत केवळ दोन वेळा उत्तर प्रदेशात गेले. जुलै २०१९ मध्ये त्यांनी आपला मतदारसंघ असलेल्या अमेठीचा दौरा केला होता. त्यानंतर ऑक्टोबर २०१९ मध्ये हाथरस घटनेतील पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी ते गेले होते.
बिहारमधील निवडणुकीची चर्चा संपूर्ण देशात होती. मात्र, येथेही राहुल यांनी खऱ्या अर्थाने एकदाच दौरा केला. कॉंग्रेसची बिहारमधील कामगिरी अत्यंत वाईट होती. राष्ट्रीय जनता दलासोबत आघाडी करून कॉंग्रेसने ७० जागा लढविल्या. मात्र, त्यांना १९ जागांवरच विजय मिळविता आला. त्यामुळे राष्ट्रीय जनता दलाचे विजयाचे स्वप्नही भंगले.
राहुल या निवडणुकीच्या प्रचारासाठी केवळ एकदाच गेले होते. उर्वरीत काळात ते आपल्या कुटुंबियांसमवेत सिमला येथे पर्यटन करत होते. राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांनी याबाबत कडक शब्दांत टीकाही केली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App